बार्शीच्या रुग्णांमध्ये आढळल्या म्युकरमायकोसिसच्या दोन प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:23 AM2021-05-27T04:23:47+5:302021-05-27T04:23:47+5:30

या रुग्णातील सायनसच्या क्लिनिकल सॅम्पलमधील बुरशीचे प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोपखाली सूक्ष्म निरीक्षण केले. त्यामध्ये दोन प्रकारच्या बुरशींच्या प्रजाती सापडल्याचे अमृता शेटे ...

Two species of mucormycosis found in Barshi patients | बार्शीच्या रुग्णांमध्ये आढळल्या म्युकरमायकोसिसच्या दोन प्रजाती

बार्शीच्या रुग्णांमध्ये आढळल्या म्युकरमायकोसिसच्या दोन प्रजाती

googlenewsNext

या रुग्णातील सायनसच्या क्लिनिकल सॅम्पलमधील बुरशीचे प्रक्रियेनंतर मायक्रोस्कोपखाली सूक्ष्म निरीक्षण केले. त्यामध्ये दोन प्रकारच्या बुरशींच्या प्रजाती सापडल्याचे अमृता शेटे मांडे यांनी सांगितले.

रुग्णाच्या क्लिनिकल सॅम्पलमध्ये आढळलेल्या दोन्ही प्रजाती भिन्न प्रकारच्या व एकत्रित आढळल्या आहेत. प्रजाती १ ही ८० % तर प्रजाती २ ही २० % प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. हे निरीक्षण रुग्णाच्या आरोग्याच्या हितासाठी व पुढील उपचाराची दिशा ठरविण्याकरिता अत्यन्त महत्त्वाचे असून आतापर्यंत ४० प्रजातींची नोंद असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

संशोधनात आढळलेल्या दोन प्रजातींपैकी १ मध्ये मायसेलिया, स्पोऱ्यांनजीओफोर, स्पोऱ्यांनजियम व असंख्य स्पोअर्स आढळले आहेत, तर

प्रजाती २ मध्ये स्पोऱ्यांनजीओफोर तसेच स्पोऱ्यांनजियम आढळले नसून, स्पोअर्स एक विशिष्ट रचनेत डायरेक्ट मायसेलियाच्या पृष्ठभागावर आढळले आहेत.

---

कोण आहेत संशोधक...

- डॉ सुहास कुलकर्णी हे निवृत्त प्रोफेसर असून सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ व संशोधक आहेत, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय समन्वयक, तसेच मराठी विज्ञान परिषद शाखा बार्शीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचे ५० पेक्षा अधिक रिसर्च पेपर्स प्रसिध्द झाले आहेत. १५ नवीन शोध लावले आहेत. अमृता शेटे मांडे या सूक्ष्मजीवशास्त्राच्या अभ्यासिका असून पीएच.डी. करत आहेत.

----

Web Title: Two species of mucormycosis found in Barshi patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.