नागणसूर येथे कोरोनाने दोन शिक्षकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:29+5:302021-05-13T04:22:29+5:30

नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील दोन जिवलग मित्र कर्नाटक राज्यात शिक्षक म्हणून कार्यरत होते. कोरोना झाल्यामुळे दोघांवर उपचार सुरू होते. ...

Two teachers killed by corona at Nagansur | नागणसूर येथे कोरोनाने दोन शिक्षकांचा मृत्यू

नागणसूर येथे कोरोनाने दोन शिक्षकांचा मृत्यू

Next

नागणसूर (ता. अक्कलकोट) येथील दोन जिवलग मित्र कर्नाटक राज्यात शिक्षक म्हणून कार्यरत होते. कोरोना झाल्यामुळे दोघांवर उपचार सुरू होते. दरम्यान, पहिल्यांदा शिवप्पा पुजारी यांचा मृत्यू झाला. या वृत्ताचा धसका घेऊन दोन दिवसांच्या अंतराने सिद्धप्पा गणेचारी यांचाही मृत्यू झाला.

शिवप्पा पुजारी (५० वर्षे, रा. नागणसूर) कर्नाटकातील तडकल येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नोकरीस होते. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे लागण झाली होती. उपचारादरम्यान ९ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, चार मुली, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. तसेच त्याचदरम्यान त्यांचा मित्र सिद्धप्पा गणेचारी (५२, रा. नागणसूर) यादगीर, जि. कलबुर्गी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यानाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मित्राच्या मृत्यूचे वृत्त समाजात दोन दिवसात त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, असा परिवार आहे.

----

सुरुवातीपासून शेवटपर्यंत मैत्री

दोघे एकाच गावचे रहिवासी असून, शिक्षणही त्यांनी एकत्र पूर्ण करून नोकरीला लागले होते. शेवटच्या क्षणीही त्यांना कोरोना लागण झाल्याचे निमित्त झाले आणि दोन दिवसांच्या फरकाने मित्राच्या मृत्यूच्या धसक्याने दुसरा शिक्षक मित्राचाही मृत्यू झाला. या वृत्ताने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

---

फोटोओळ:- १) शिवप्पा पुजारी उभा फोटो

२) सिद्धप्पा गणेचारी आयडेंटि साईज फोटो

Web Title: Two teachers killed by corona at Nagansur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.