दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:49+5:302021-02-14T04:21:49+5:30

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्यात अक्कलकोट तालुका पाचव्या क्रमांकावर आहे. यामुळे लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. लस ...

Two thousand officers, employees vaccinated with corona | दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

दोन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

Next

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये जिल्ह्यात अक्कलकोट तालुका पाचव्या क्रमांकावर आहे. यामुळे लस कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. लस उपलब्ध होताच प्रथम या काहात कर्तव्य बाजावलेले शासकीय, निमशासकीय, अधिकारी, कर्मचारी यांना प्राधान्याने देण्याचे ठरले. त्यानुसार लस देण्यात येत आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात आतापर्यंत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड, तहसीलदार अंजली मरोड, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी, गटविकास अधिकारी महादेव कोळी, मुख्याधिकारी सचिन पाटील यांच्यासह आरोग्य, पोलीस, पंचायत समिती, नगरपालिका कर्मचारी, पोलीसपाटील, महसूल कर्मचारी असे एकूण २ हजार कर्मचारी यांना ही लस देण्यात आली.

कोट :::::::::::

तालुक्यातील दोन हजार विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना स देण्यात आली आहे. त्यापैकी एकाही व्यक्तीला काही त्रास झालेल नाही. उर्वरित कर्मचाऱ्यांनासुद्धा लस देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वांना लस देण्याचे नियोजन आहे.

- डॉ. आश्विन करजखेडे,

तालुका वैद्यकीय अधिकारी

फोटो

१३अक्कलकोट-कोविड लस

ओळी

अक्कलकोटच्या तहसीलदार अंजली मरोड यांना कोविड लस देताना वैद्यकीय कर्मचारी. त्याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आश्विन करजखेडे व अन्य.

Web Title: Two thousand officers, employees vaccinated with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.