महापरिनिर्वाण दिनी मुंबईला जाण्यासाठी सोलापुरातून दोन रेल्वे आरक्षित
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 27, 2022 04:52 PM2022-11-27T16:52:35+5:302022-11-27T16:53:07+5:30
कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अनारक्षित एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सुटणार आहे.
सोलापूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाण्यासाठी सोलापूर रेल्वे प्रशासनाने कलबुर्गी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (०१२४५-०१२४६) तसेच सोलापूर एक्स्प्रेस (०१२४७-०१२४८) या दोन गाड्या सोडण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्या आरक्षित राहतील, असे सोलापूर रेल्वे प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.
कलबुर्गी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अनारक्षित एक्स्प्रेस ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता कलबुर्गी येथून सुटणार आहे. गाणगापूर येथे ६.५८ वाजता, अक्कलकोट रोड रेल्वे स्थानकावर ७.३५ वाजता तसेच सोलापूर रेल्वे स्थानकावर ९.४० वाजता येथे ही गाडी येणार आहे. तसेच रात्री १०.२० वाजता सोलापूर येथून प्रस्थान होईल. कुर्डूवाडी, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी ८.२० वाजता पोहोचेल. नंतर हीच गाडी मुंबई येथून बुधवार, ७ डिसेंबर रोजी रात्री १२.२५ वाजता सुटणार आहे. कलबुर्गी येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस सोमवार, ५ डिसेंबर रोजी रात्री १०.२० वाजता सोलापूर येथून सुटेल. ही गाडी मुंबई येथे सकाळी ८.२० वाजता पोहोचणार आहे. तर हीच गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार, ७ डिसेंबर रोजी रात्री १२.२५ वाजता सुटणार आहे. सोलापूर येथे ८.४५ वाजता पोहोचणार आहे.