सोलापुरातील गृहिणी रोज घालतात दोन ट्रक कैरीचं लोणचं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 03:22 PM2019-05-06T15:22:47+5:302019-05-06T15:24:27+5:30

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बिदर, पुणे, भालकी, हैदराबाद आदी ठिकाणाहून कैरी येत आहेत.

Two truck carri pickles in Solapur are hauling every day | सोलापुरातील गृहिणी रोज घालतात दोन ट्रक कैरीचं लोणचं

सोलापुरातील गृहिणी रोज घालतात दोन ट्रक कैरीचं लोणचं

Next
ठळक मुद्देसोलापुरात असलेल्या प्रमुख भाजी मंडईत लोणच्याचं कैºया फोडून त्याचे मागणीनुसार बारीक तुकडे करून देण्यात येतेभाजी मंडईत कच्च्या कैºया खरेदी करून या ठिकाणी त्याचे बारीक तुकडे करून घेताना गृहिणी दिसून येत आहे.वर्षभर जेवणासोबत आवश्यक असणारा खमंग व चटपटीत खाद्यपदार्थ बनविण्याचे काम गृहिणीकडून उन्हाळ्यात होते

संतोष आचलारे 

सोलापूर : उन्हाळ्याच्या दिवसात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ वाळवत घालून तयार करण्यात गृहिणी व्यस्त आहेत. जेवणासोबत रोजच हवंहवंसं वाटणारं कैरीचं लोणचंही गृहिणी घालत आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधून रोज दोन ट्रक कैºयांची आवक शहरातील सर्व भाजी मंडईत होत असून या कैरीचं लोणचं घालण्यात येत आहे. ९0 रुपये किलोप्रमाणे किरकोळ बाजारात लोणच्याची कैरी विकली जात आहे.

वर्षभर जेवणासोबत आवश्यक असणारा खमंग व चटपटीत खाद्यपदार्थ बनविण्याचे काम गृहिणीकडून उन्हाळ्यात होते. बाजारात सर्व काही रेडिमेड मिळत असतानाही सोलापुरातील अनेक गृहिणींचा कल मात्र घरातच असे खाद्यपदार्थ बनविण्याचा दिसून येत आहे. शंभर ते दीडशे रुपयास बाजारात तयार लोणचं बाटली मिळते; मात्र घरात तयार केलेल्या लोणच्याची चव अन् पुरवठा भारी असल्याने कैºया विकत घेऊनच लोणचं घालण्यात येत आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बिदर, पुणे, भालकी, हैदराबाद आदी ठिकाणाहून कैरी येत आहेत. येथून शहरातील लक्ष्मी मंडई, कस्तुरबा, सुपर मार्केट, अशोक चौक, घोंगडे वस्ती आदीसह शहरातील अन्य भाजीपाला बाजारात किरकोळ विक्रेते कैरी विकत आहेत. सुमारे आणखीन दोन महिने लोणच्याची कैरी या बाजारात विकली जाणार आहे. जवारी कैरी लोणच्यासाठी घेण्याचा कल गृहिणींचा अधिक आहे. आतून अत्यंत पांढरा शुभ्र व आकाराने मोठ्या असणाºया कैरीचेही आकर्षण वाढले आहे; मात्र या कैरी किलोत तीन नगच बसत असल्याने गृहिणींचा हिरमोड होताना दिसून येतो.

कैºयांसाठी आवश्यक असणारा मसाला तयार मिळत आहे. त्यामुळे अनेक गृहिणी तयार मसाला घेत आहेत. तर काही गृहिणी या आद्रक, लसूण, गोडेतेल, मीठ, मेथ्या आदींची स्वतंत्रपणे खरेदी करून  कच्या कैºयांना फोडणी देत आहेत. घरात तयार केलेली कैरी चिनी मातीच्या भरणीत बंदिस्त करून ठेवण्यात येत आहे. कैरींच्या लोणच्यांनी भरलेल्या भरण्यांची साठवणूक गृहिणींकडून सुरक्षित ठिकाणी घरात करण्यात येत असल्याची माहिती गृहिणी सुभद्रा शेळगे यांनी दिली. 

२० ते ३० रुपयात मंडईत कैºया फोडून मिळतात
सोलापुरात असलेल्या प्रमुख भाजी मंडईत लोणच्याचं कैºया फोडून त्याचे मागणीनुसार बारीक तुकडे करून देण्यात येते. यासाठी २0 ते ३0 रुपयांची मजुरी घेण्यात येत आहे. भाजी मंडईत कच्च्या कैºया खरेदी करून या ठिकाणी त्याचे बारीक तुकडे करून घेताना गृहिणी दिसून येत आहे. मागील महिनाभरापासून असे काम सुरू करण्यात आले असून, आणखीन दोन महिने हे काम चालूच राहणार असल्याची माहिती लक्ष्मी भाजी मंडईतील कैरी कापून देणारे अकबर नाईकवाडी यांनी दिली. 

Web Title: Two truck carri pickles in Solapur are hauling every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.