चोरीला गेलेल्या ९०० पोती सिमेंट पोतीसह दोन ट्रक शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:49 AM2020-12-11T04:49:26+5:302020-12-11T04:49:26+5:30

सांगोला : येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रकसह ९०० पोती सिमेंट जप्त केला. सांगोला पोलिसांनी सरत्या वर्षी ...

Two trucks with 900 bags of cement were found stolen | चोरीला गेलेल्या ९०० पोती सिमेंट पोतीसह दोन ट्रक शोधले

चोरीला गेलेल्या ९०० पोती सिमेंट पोतीसह दोन ट्रक शोधले

Next

सांगोला : येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी चोरीला गेलेला ट्रकसह ९०० पोती सिमेंट जप्त केला. सांगोला पोलिसांनी सरत्या वर्षी चोरीला गेलेल्या ट्रकचा तपास लावल्याने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कौतुक केले आहे.

याप्रकरणी पांडुरंग दादासाहेब बंडगर, अशोक नानासाहेब बंडगर (दोघेही रा. हातीद, ता. सांगोला), नारायण उर्फ धनाजी शिवाजी मुडदे व विजय हरीराम मोरे (दोघेही रा. लांडगेवाडी, ता. कवठेमहाकाळ) यांना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

हतीद येथील नवनाथ मोहन खंडागळे हा चालक एम. एच. १३, सी. यू. ५९२३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये ५०० पोती सिमेंट घेऊन निघालेला होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८च्या सुमारास मीरजरोडवर दत्त हायवे पेट्रोलपंपाजवळ ट्रक उभा करून जेवण करण्यासाठी घरी गेला होता. चोरट्यांनी संधी साधून सिमेंटने भरलेला मालट्रक पळविला. दरम्यान, याच गावचा दुसरा ट्रकचालक नीलेश भगत यानेदेखील २३ ऑगस्ट रोजी दुपारी तीनच्या सुमारास अमर बंडगर यांच्या घराशेजारील नवीन रस्त्यावर ट्रक (एम.एच. १३, ए.एक्स. ३०४३) उभा करून घरी गेला. चोरट्यांनी हाही ट्रक पळविला. त्यातील ४०० पोती सिमेंट, ट्रकचे दोन टायर व ७० लिटर डिझेल चोरून ट्रक हातीदरोडवर उभे करून निघून गेले.

याबाबत सांगोला पोलिसांत गुन्हे दाखल होते. दरम्यान, या गुन्हाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास करून दोन्ही सिमेंट ट्रक शोधून काढत दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी पोलीस हवालदार बापूसाहेब झोळ, पोलीस नाईक दत्ता वजाळे, पोलीस नाईक विजय थिटे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल राहुल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब पाटील यांनी केली.

Web Title: Two trucks with 900 bags of cement were found stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.