दोन बाईकसह मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस

By विलास जळकोटकर | Published: February 6, 2024 06:05 PM2024-02-06T18:05:31+5:302024-02-06T18:06:06+5:30

जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी जेलरोड ...

Two who stole mobile phones along with two bikes jailed; Three crimes were revealed | दोन बाईकसह मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस

दोन बाईकसह मोबाईल चोरणारे दोघे जेरबंद; तीन गुन्हे उघडकीस

जेलरोड पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवारी जेलरोड पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणाहून बाईक चोरीला गेल्याची तक्रार नागेश चिलवेरी (रा. गुरुदेव नगर, सोलापूर) व म. गौस अब्दुल रजाक शेख (रा. विडी घरकूल, सोलापूर) यांनी पोलीस ठाण्यात नोंदलेल्या होत्या. याशिवाय ८२ हजार ५०० रुपयांचा आयफोन चोरीला गेल्याबद्दल महेश नागेश कैंची (रा. जुना विडी घरकूल, सोलापूर) यांनी नोंदली होती.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने डीबी पथकाने खबऱ्याच्या माहितीनुसार शोध घेऊन वसीम इब्राहिम अत्तार (वय २९, रा. संजय गांधीनगर, विजापूर रोड, सोलापूर) व आकाश सिद्राम लिंबाळे (वय- २८, रा. गुल्लापल्ली झोपडपट्टी, रविवार पेठ, सोलापूर) यांना अटक करुन त्यांच्याकडून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोगल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश पाटील- सोनवणे, हवालदार शेख, धुमाळ, कनगिरी, गंगावणे, माने, बाबर, बागलकोटे, गायकवाड यांनी केली.

Web Title: Two who stole mobile phones along with two bikes jailed; Three crimes were revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.