हातचलाखी करीत दोन महिलांनी महूदमध्ये आठ जोड पैंजण लांबवले

By काशिनाथ वाघमारे | Published: May 21, 2023 06:44 PM2023-05-21T18:44:18+5:302023-05-21T18:45:38+5:30

हातचलाखी करीत २५ हजारांचे ५०० ग्रॅम चांदीचे ८ जोड पैंजण चोरून पोबारा केला.

two women theft out eight pairs of panjans in mahood | हातचलाखी करीत दोन महिलांनी महूदमध्ये आठ जोड पैंजण लांबवले

हातचलाखी करीत दोन महिलांनी महूदमध्ये आठ जोड पैंजण लांबवले

googlenewsNext

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: पैंजण खरेदी करण्याच्या बाहण्याने सराफाच्या दुकानात आलेल्या दोन महिलांनी पैंजण खरेदी न करता हातचलाखी करीत २५ हजारांचे ५०० ग्रॅम चांदीचे ८ जोड पैंजण चोरून पोबारा केला. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता सांगोला तालुक्यात महूद येथील जाधव ज्वेलर्स या दुकानात घडली. याबाबत सराफी चंद्रशेखर अशोक जाधव (रा. चिकमहूद) यांनी फिर्याद दिली आहे.

पाेलिस सूत्राकडील माहितीनुसार, सराफी चंद्रशेखर जाधव हे शनिवारी सकाळी त्यांच्या दुकानात असताना दोन अनोळखी महिला आल्या. त्यांनी पैंजण खरेदी करायचे आहे, पैंजण दाखवा म्हणाल्या. ते पैंजण दाखवत असताना आणखी दोन अनोळखी महिला दुकानात आल्या आणि पैंजण पाहून खरेदी न करता निघून गेल्या. त्यानंतर ते पैंजण परत लाॅकरमध्ये ठेवताना ८ जोड चांदीचे पैंजण कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानात आलेल्या दोन महिलांनी चोरी केल्याचे लक्षात आले.

त्यामधील काउंटर जवळ उभ्या असलेल्या महिलेने पैंजण पाहण्याच्या बहाण्याने पाठीमागील महिलेच्या हातात पैंजण देऊन लांबवले. या महिला दुकानातून निघून जाताच त्यांनी दुकान परिसर आणि गावात शोध घेतला असता त्या कोठेही मिळून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Web Title: two women theft out eight pairs of panjans in mahood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.