मोडनिंब येथील दोन तरुणांना जन्मठेपेची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:28 AM2021-02-25T04:28:06+5:302021-02-25T04:28:06+5:30
मोडनिंब येथील गणेश सोनबा धोत्रे (वय २५) व दीपक सुनील धोत्रे (२३) या दोघांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी पूर्ववैमनस्यातून ...
मोडनिंब येथील गणेश सोनबा धोत्रे (वय २५) व दीपक सुनील धोत्रे (२३) या दोघांनी १५ सप्टेंबर २०१७ रोजी पूर्ववैमनस्यातून तसेच वराहाचे पालन करणे व मारणे या कारणावरून विकास अनिल धोत्रे (२२) याचा मोडनिंब येथील रेल्वेलाईनलगत असलेल्या श्रीपादबाबा मंदिराच्या परिसरात गळा चिरून खून केला होता. याबाबत मृताचा भाऊ नितीन अनिल धोत्रे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक आनंद खोबरे व त्यांचे दप्तरी सहाय्यक फौजदार अशोक बाबर, पोलीस नाईक धनाजी शेळके यांनी तपास केला. तपासकामी करमाळ्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील राजकुमार केंद्रे यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. या कामी सरकारी अभियोक्ता म्हणून दिनेश देशमुख, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल अमृत खेडकर यांनी काम पाहिले. अटकेत असलेल्या आरोपींना जामीन मिळावा यासाठी जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात आरोपीच्या वकिलांनी प्रयत्न केले; परंतु न्यायालयाने दोन्ही ठिकाणी जामीन अर्ज फेटाळला होता. अखेर न्यायाधीश ए. बी. भस्मे यांनी सरकारी वकील डी. डी. देशमुख यांचा युक्तिवाद ऐकून वरील निकाल दिला.