माढा येथे टायर पेटविले; शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा निषेध, मराठा समाज आक्रमक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 11:45 AM2023-09-02T11:45:51+5:302023-09-02T11:47:14+5:30

छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून शासनाच्या घोषणा देत या लाठ्ठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

tyres burnt in madha and shinde fadnavis pawar government protest maratha society aggressive | माढा येथे टायर पेटविले; शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा निषेध, मराठा समाज आक्रमक 

माढा येथे टायर पेटविले; शिंदे, फडणवीस, पवार सरकारचा निषेध, मराठा समाज आक्रमक 

googlenewsNext

अमर गायकवाड, माढा: जालना येथील मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माढा शहरासह परिसरात मराठा समाज आक्रमक झाला असून माढा दारफळ येथील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवून घटनेचा निषेध करण्यात आला. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर पेटवून शासनाच्या घोषणा देत या लाठ्ठी हल्ल्याचा निषेध करण्यात आला.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून मराठ्यांना न्याय देण्याची मागणी आंदोलकांनी केली. तर माढा शहरात तालुकास्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आले असल्याचे सकल मराठा समाजाच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी आमदार बबनराव शिंदे यांनी उपस्थिती दाखवत घटनेचा निषेध करून मराठ्यांना आरक्षण देण्याची मागणी केली.

Web Title: tyres burnt in madha and shinde fadnavis pawar government protest maratha society aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.