उद्धव ठाकरे नाममात्र मुख्यमंत्री; शरद पवारांच्या हाती रिमोट कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:23+5:302021-03-16T04:23:23+5:30

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यात पत्रकारांशी ते बोलत होते. खा. नाईक-निंबाळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला ...

Uddhav Thackeray nominal Chief Minister; Remote control in the hands of Sharad Pawar | उद्धव ठाकरे नाममात्र मुख्यमंत्री; शरद पवारांच्या हाती रिमोट कंट्रोल

उद्धव ठाकरे नाममात्र मुख्यमंत्री; शरद पवारांच्या हाती रिमोट कंट्रोल

Next

करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यात पत्रकारांशी ते बोलत होते. खा. नाईक-निंबाळकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला असून, राज्यातील आठ कोटी शेतकरी उद्‌ध्वस्त झाले आहेत.

विधानसभेत वीज तोडणार नाही अशी घोषणा करायची आणि नंतर लगेचच अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू करायची हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार आहे. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी उद्‌ध्वस्त झाला. शेतात उत्पन्न झालेला अब्जावधी रुपयांचा शेतीमाल शेतकऱ्यांना फेकून द्यावा लागला. अशा या लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल वसुली केली जात आहे, आज ग्रामीण भाग अंधारात आहे तरी या ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्याबद्दल दया, माया येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण ते शरद पवारांच्या इशाऱ्यावर राज्याचा कारभार करतात, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, अमरसिंह साळुंखे, काका सरडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

------------

Web Title: Uddhav Thackeray nominal Chief Minister; Remote control in the hands of Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.