नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

By विलास जळकोटकर | Published: May 7, 2023 05:15 PM2023-05-07T17:15:36+5:302023-05-07T17:16:33+5:30

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ...

Uddhav Thackeray's statement on Narendra Modi's philanthropic attitude is clearly wrong says Ramdas Athawale | नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

नरेंद्र मोदी वि्ध्वसंक वृत्तीचे हे उद्धव ठाकरे यांचे विधान साफ चुकीचे - रामदास आठवले

googlenewsNext

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका विध्वंसक वृत्तीचे आहे, त्यांच्यामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आरोप चुकीचा आहे. यापूर्वी ते त्यांच्या सोबतच होते तेव्हाचे विधान वेगळे होते. लोकांचा कौल मान्य केला पाहिजे, असे सुतोवाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रविवारी सोलापुरात पत्रकारांशी बोलताना केले. 

कर्नाटकात निवडणुकीच्या दौऱ्यासाठी निघालेले रामदास आठवले सोलापुरात मुक्कामासाठी थांबले होते. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून विविध राजकीय घडामोडींबद्दल संवाद साधला. शरद पवार यांनी जो राजीनामा दिला होता तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणल्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. राष्ट्रीय पातळीवर शरद पवार यांच्याशिवाय अन्य कोणीही नेता नाही. त्यामुळे शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा होती. तो मानून राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व निर्माण व्हावे त्यामुळे पवारांनी राजीनामा मागे घेतला असावा असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

शिंदे सरकारला धोका नाही

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे १६४ आमदार असल्यामुळे सरकारला धोका नाही. न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्या बाजूनेच लागेल. त्यांच्याकडे ७५ टक्के बहूमत आहे. निकाल काहीही लागला तरी सरकार स्थिर राहील, असे आठवले यांनी स्पष्ट केले

Web Title: Uddhav Thackeray's statement on Narendra Modi's philanthropic attitude is clearly wrong says Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.