उडगी ग्रामपंचायत तिसऱ्यांदा बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:38+5:302021-01-02T04:18:38+5:30
उडगी : कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणुकीवर होणारा लाखो रुपये खर्च, गट-तटाचे राजकारण, हेवेदावे, भाऊबंदकीतील वाद यांना बगल देत ...
उडगी : कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणुकीवर होणारा लाखो रुपये खर्च, गट-तटाचे राजकारण, हेवेदावे, भाऊबंदकीतील वाद यांना बगल देत अक्कलकोट तालुक्यात उडगी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत सामंजस्याने यंदा ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी १९८५, १९९० साली उडगी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती.
गेल्या महिन्याभरापासून गावपातळीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बैठका झडत होत्या. गाव बिनविरोध व्हावे यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर प्रयत्नांना यश आले. उडगी ग्रामपंचायत स्थापनेपासून इतिहास तिसऱ्यांदा बिनविरोध झाल्याने सर्व उमेदवार व कार्यकर्ते गावातील मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. ग्रामस्थांनी एकमेकांना हस्तोलंदन, गळाभेट घेऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. निवडणूक बिनविरोध करण्यात तंटामुक्त अध्यक्ष धोंडप्पा यळमेली, हणमंत कात्राबाद, ओंकारेप्पा हारकूड, महेश बिराजदार यांनी परिश्रम घेतले.