सोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

By appasaheb.patil | Published: August 3, 2019 02:12 PM2019-08-03T14:12:20+5:302019-08-03T14:22:21+5:30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठ ; बारावी उत्तीर्ण  विदयार्थ्यांना प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी 

UGC approves journalism degree course at Solapur University | सोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

सोलापूर विद्यापीठात पत्रकारिता पदवीच्या अभ्यासक्रमाला युजीसीची मंजुरी

Next
ठळक मुद्देकोणत्याही विद्याशाखेची बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विदयार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणारआजच्या काळात पदवीबरोबर काही कौशल्ये ज्यांच्याकडे असतील, त्यांनाच नोकरीची संधी मिळतेहा अभ्यासक्रम तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विदयाशाखेच्या विदयार्थ्यांना प्रवेश घेता येईल

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या सामाजिक शास्त्रे संकुलातील मास कम्युनिकेशन विभागाच्यावतीने ह्यबॅचलर ऑफ व्होकेशनल पत्रकारिता व जनसंज्ञापनह्ण हा पदवी  अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजुरी दिल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास सुरुवात झाली असून कोणत्याही विद्याशाखेची बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण विदयार्थ्यांना या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. प्रवेशासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. आजच्या काळात पदवीबरोबर काही कौशल्ये ज्यांच्याकडे असतील, त्यांनाच नोकरीची संधी मिळाते. ही गरज लक्षात घेऊन विदयापीठ अनुदान आयोगाने कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम विदयापीठे आणि महाविदयालयात सुरू व्हावेत यासाठी बी. होक. या योजनेअंतर्गत काही अभ्यासक्रमांची निवड केली व त्यासाठी अनुदान देण्यास सुरुवात केली.

या योजने अंतर्गत अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी देशभरातून अर्ज मागवले होते.  विद्यापीठ अनुदान आयोगाने आलेल्या  प्रस्तावामधून काही निवडक विदयापीठे व महाविदयालयांना अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठातील पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या अभ्यासक्रमाचा समावेश आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.

हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण झालेल्या कोणत्याही विदयाशाखेच्या विदयार्थ्यांना प्रवेश घेता येईल. हा अभ्यासक्रम कौशल्य विकासावर आधारित असल्याने हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विदयार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टीव्ही, सिनेमा, ऑनलाईन पत्रकारिता , जनसंपर्क, जाहिरात तसेच शासकीय क्षेत्रात  नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. तसेच या कौशल्यांचा उपयोग करुन स्वतःचा व्यवसाय सुरु करता येईल. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्ट 2019 पासून सुरुवात आहे. 

पत्रकारिता आणि जनसंज्ञापन या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांनी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावा, असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. जी. एस. कांबळे यांनी केले आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी विदयापीठातील पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर   यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विदयापीठाच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: UGC approves journalism degree course at Solapur University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.