उजनीनं साठी ओलांडली.. आता कालव्याला पाणी सोडण्यासाठी जोर वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:51+5:302021-08-12T04:26:51+5:30

भीमानगर : उजनीचा एकूण पाणीसाठा ९६.५ टीएमसी झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ३३.२५ टीएमसी झाला आहे, तर दहीगाव उपसा ...

Ujani crossed for .. Now the pressure to release water to the canal increased | उजनीनं साठी ओलांडली.. आता कालव्याला पाणी सोडण्यासाठी जोर वाढला

उजनीनं साठी ओलांडली.. आता कालव्याला पाणी सोडण्यासाठी जोर वाढला

Next

भीमानगर : उजनीचा एकूण पाणीसाठा ९६.५ टीएमसी झाला असून, उपयुक्त पाणीसाठा ३३.२५ टीएमसी झाला आहे, तर दहीगाव उपसा सिंचन १२६ क्युसेक्स, सीना माढा २५९ क्‍युसेक व बोगदा १५० क्‍युसेकने विसर्ग सुरू असून धरणाची टक्केवारी ६२.४० वरच गेले दोन दिवस झाले स्थिरावली आहे. आता कालव्याला पाणी सोडण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

बंडगार्डनमधून ४३५९ क्युसेक, दौंडमधून ३६३५ क्युसेक्स विसर्ग स्थिर असून पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यावरच आता उजनीच्या विसर्गात वाढ होणार आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. कालवा काठावरील बागायती पिके हातातोंडाशी आलेली आहेत; परंतु पाऊस पडेना झाल्याने या पिकांसाठी कालव्यातील उचल पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यातच उजनीच्या वरील जवळपास १० मोठी धरणे शंभर टक्के भरली आहेत. येणाऱ्या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी हे उजनीत येणार आहे त्यामुळे उजनी आता भरणार तर आहेच मग उजनीवरती असणाऱ्या योजनेवर अवलंबून असणाऱ्या अनेक योजनांना थोडे थोडे का होईना पण पाणी द्यावे, अशी शेतकऱ्यांमधून मागणी होऊ लागली आहे.

---

Web Title: Ujani crossed for .. Now the pressure to release water to the canal increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.