उजनी धरण १११ टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 01:06 PM2020-10-13T13:06:38+5:302020-10-13T13:08:13+5:30
भीमाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; परतीच्या पावसाचा सोलापूरला फायदा
पंढरपूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून धरण १११ टक्के भरल्यामुळे धरणातून सोमवारी सकाळपासून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे.
सकाळी २० हजार क्युसेक असलेला विसर्ग दुपारी ५ हजार क्युसेकपर्यंत कमी केला होता. मात्रनंतर ३ वाजता त्यात वाढ करून परत तो १० हजार क्युसेक करण्यात आला आहे.नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनी धरण १११ टक्के भरलेले आहे. गेल्या दोन दिवसात उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असून, पुणे जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीला पाणी सोडण्यात येत आहे.