उजनी धरणाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:21 AM2021-08-01T04:21:50+5:302021-08-01T04:21:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : उजनी धरणाने बघता बघता शनिवारी ५० टक्के टप्पा गाठला आहे. उजनी धरण शनिवारी ...

Ujani dam | उजनी धरणाने

उजनी धरणाने

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

भीमानगर : उजनी धरणाने बघता बघता शनिवारी ५० टक्के टप्पा गाठला आहे. उजनी धरण शनिवारी ५० टक्के भरले म्हणजे धरणात ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. जुलै महिन्यात पाणी उजनीत आले याचे कारण वजा २३ टक्केवर गेलेले उजनी धरण उपयुक्त ५० टक्क्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील कळमोडी १०० टक्के आंध्रा १००, चासकमान ८० वडिवळे ८७, भामा-आसखेड ८३ टक्के तर खडकवासला १०० टक्के , मुळशी ७५, पावना ८७, कासारसाई ८८, येडगाव ८४, डिंभे ७४ वडज ५८, माणिकडोह ३७, घोड ३७ टक्के भरली असून जवळपास ११ धरणे ही ७५ टक्क्यांच्या वर भरलेली आहेत.

हवामान खात्याने यावर्षी भरपूर पावसाचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात उजनी भरू शकते. गेल्या तीन दिवसापेक्षा शनिवारी विसर्गात वाढ झाली आहे. बंडगार्डनमधून १३१६१ क्युसेक तर दौंडमधून विसर्ग येत होता ११,३६५ क्‍युसेक, खडकवासला ४०००, भामा-आसखेड ८०० सहाशे क्यूसेकनी बंडगार्डनमध्ये विसर्ग मिसळत होता.

---

उजनी सद्यस्थिती

एकूण पाणीपातळी ४९४.३१५ मीटर

एकूण पाणीसाठा २५६१.२७ दलघमी (टीएमसी ९०.४४)

उपयुक्त पाणी साठा ७५८.२७ दलघमी (टीएमसी २६.७८)

टक्केवारी -५०

विसर्ग -दौंड ११३६५, बंडगार्डन १३१६१

---

Web Title: Ujani dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.