उजनी धरण मायनसमध्ये, उपयुक्त साठा संपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:22 AM2021-05-13T04:22:49+5:302021-05-13T04:22:49+5:30

अजूनही उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. ११७ टीएमसी पाणी साठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी पाणी मृतसाठा ...

In Ujani Dam minus, useful stocks run out | उजनी धरण मायनसमध्ये, उपयुक्त साठा संपला

उजनी धरण मायनसमध्ये, उपयुक्त साठा संपला

Next

अजूनही उजनी धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे.

११७ टीएमसी पाणी साठ्यापैकी ५४ टीएमसी पाणी उपयुक्त तर ६३ टीएमसी पाणी मृतसाठा आहे. पुढील महिन्यात बरोबर १३ जूनपासून मान्सून सक्रिय होईल व पाण्याची चिंता थोड्या प्रमाणात कमी होईल.

सद्य:स्थितीत उजनीची एकूण पाणी पातळी ४९१.०६० मीटर, एकूण पाणीसाठा १८०८.७६ दलघमी (टीएमसी ६३.८७), उपयुक्त पाणीसाठा ५.९५ दलघमी (टीएमसी ०.२१) टक्केवारी ०.३९ टक्के.

उजनीतून दहिगाव उपसा सिंचन ८५ क्युसेक, बोगदा ६३० क्युसेक, कालवा ३१५० क्युसेकनी विसर्ग सुरू आहे.

उजनी धरणाची पाणी साठवण समता महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असून या धरणातील पाण्यावर किमान ४५ साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. तसेच सोलापूर शहरासह शेकडो गावांना पाणीपुरवठा त्यातून जवळपास तीस लाख नागरिकांची तहान भागते. हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोय होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.

Web Title: In Ujani Dam minus, useful stocks run out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.