उजनी धरणाची ९० टक्क्यांकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:25 AM2021-09-23T04:25:16+5:302021-09-23T04:25:16+5:30
भीमाशंकर घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानेही व्यक्त ...
भीमाशंकर घाटमाथ्यावर मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार चालू आहे. पुढील दोन-तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानेही व्यक्त केली आहे. तसेच उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या बहुतेक धरणातील पाणी पातळी ९० टक्क्यांच्या जवळपास असल्याने पाणी भीमा नदीत सोडले जाऊ शकते. त्यामुळे उजनीत येणारा विसर्ग वाढून धरण भरण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी आहे.
मागील महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्याने धरणातील पाणीपातळी ६० टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. त्यानंतर त्यात वाढ होऊन ती संथगतीने का होईना ९० टक्क्यांकडे वाटचाल करत आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत धरणात ८३.३० टक्के पाणीसाठा झाला आहे. बंडगार्डन येथून विसर्ग वाढल्याने धरण दोन-तीन दिवसात नव्वद टक्क्यांची पातळी ओलांडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
.........
धरणाची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी :४९६.०५० मीटर
एकूण पाणीसाठा: १०८.३४ टीएमसी
उपयुक्त साठा : ४४.६५ टीएमसी
टक्केवारी : ८३.३०