उजनी पाणी घटनाक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:54+5:302021-05-28T04:17:54+5:30

२४ एप्रिल - पालकमंत्र्यांवर सर्वपक्षीय नेते भडकले; उजणी धरणात नागरिकांनी बोटीत पालकमंत्र्यांचा बॅनर फाडला २५ एप्रिल- इंदापूरसाठी उजनीतून ...

Ujani water events | उजनी पाणी घटनाक्रम

उजनी पाणी घटनाक्रम

Next

२४ एप्रिल - पालकमंत्र्यांवर सर्वपक्षीय नेते भडकले; उजणी धरणात नागरिकांनी बोटीत पालकमंत्र्यांचा बॅनर फाडला

२५ एप्रिल- इंदापूरसाठी उजनीतून सांडपाणी; पालकमंत्र्यांची कबुली

२६ एप्रिल - उजनी संघर्ष समिती आक्रमक; तहसीलदारांना निवेदन

२७ एप्रिल -शेतकरी संघटना आक्रमक : महाराष्ट्रदिनी सामूहिक जलसमाधी इशारा इशारा

२८ एप्रिल - लोकप्रतिनिधींची मूक संमती : रयत क्रांतीचा आरोप

२९ एप्रिल - खासदार निंबाळकर : न्यायालयात जाणार

२९ एप्रिल - पालकमंत्र्यांनी सोलापूरचा नाद करायचा नाय : प्रणिती शिंदे

२९ एप्रिल - पालकमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही : विजयकुमार देशमुख

३० एप्रिल - जिल्ह्याचे पाणी पळवल्यास गंभीर परिणाम : शहाजीबापूंचा इशारा

३० एप्रिल - नियोजन भवनाभवती कडक बंदोबस्त; पालकमंत्र्यांची वरवरची उत्तरे

२ मे - सात तासांनंतर जलसमाधी आंदोलन मागे

३ मे - शासनाच्या निर्णयाला तीव्र विरोध असेल - राजन पाटील

५ मे - पाणी शेतकऱ्यांच्या हक्काचे नाही बारामतीकरांसाठी : सोमेश क्षीरसागर

६ मे - राष्ट्रवादीचे नेतेच धरणग्रस्तांच्या मुळावर : रयत क्रांती

६ मे - आमदार बबनराव शिंदे यांचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार

८ मे - इंदापूरला पाणी नेण्यासाठी प्रणिती शिंदेचाही विरोध

१२ मे - पालकमंत्र्यांविरोधात दोन खासदार, आठ आमदारांचे उपोषण

१४ मे - पुण्याचे सांडपाणी खडकवासल्यातून उचला; उजनी जलाशय प्रदूषणमुक्त ठेवा

१४ मे - पालकमंत्री म्हणाले, उजनी विषय संपला, बोलण्यास टाळाटाळ

१५ मे - जनहितचे पाचव्या दिवशीही आंदोलन

१५ मे - पाच टीएमसी निर्णयाला स्थगिती द्या अन्यथा न्यायालयीन लढा : आमदार बबनराव शिंदे

१७ में - आमदार शहाजी बौप यांच्या घरासमोर हलगीदार आंदोलन

१७ मे - पाणी देण्याच्या निर्णयाची गावागावांतून होळी

१७ मे - आंदोलनास महिलाही सरसावल्या

२० में - पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : आमदार प्रशांत परिचारक

२० मे - जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आदेश रद्द केल्याबाबत घोषणा

२० मे - धरणावरचे आंदोलन थांबविण्यासाठी धावपळ; लेखी पत्र मिळविण्यासाठी तारांबळ

२१ मे - इंदापूरमधील शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन; सोलापूरला सोडलेले पाणी जाऊ देणार नाही

२२ मे - आंदोलनाच्यावेळी मी इंदापुरात नव्हतो, त्यांची समजूत काढली ते शांत होतील : पालकमंत्री

२४ मे - शेतकरी संघटना आक्रमक : जलसंपदा मंत्र्यांचा पुतळा जाळला

२६ मे - शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठा पोलीस बंदोबस्त

२६ मे - शेतकऱ्यांचा उद्रेक होत असताना मुख्यमंत्री गप्प का : प्रभाकर देशमुख

२७ मे - इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द

Web Title: Ujani water events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.