उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचा कुरुल येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:49+5:302021-05-29T04:17:49+5:30
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी ...
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे यांनी शेतकरी व माध्यमांच्या सहकार्याने उजनी पाणी बचाव संघर्ष समिती व सर्वच संघटनांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनामुळे उधळून लावला आहे. मात्र यापुढेही संघर्ष समिती उजनीच्या पाण्याचे जीवापाड रक्षण करण्याचे काम करेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, सरपंच पती माणिक पाटील, उपसरपंच पांडुरंग जाधव, ॲड. बापूसाहेब मेटकरी, धनाजी गडदे, किरण भांगे, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब जाधव, माऊली जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद जाधव, यल्लपा पडवळे, भागवत सुमते, माळी महासंघाचे अध्यक्ष नानासाहेब ननवरे, राजकरण घोडके, जे. एस. भोसले, संतोष जाधव, अमोल खंदारे, संभाजी घोडके, खाजाभाई शेख आदी उपस्थित होते.
संघर्ष समितीने व सर्व शेतकरी संघटनांनी लढा उभारून जनमताचा रेटा लावून यशस्वी करून दाखविल्याचे जालिंदरभाऊ लांडे म्हणाले. प्रास्ताविक सुहास घोडके यांनी तर आभार माऊली जाधव यांनी मानले.
---
हा कुठला न्याय?
आता तरी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जागरूक राहून निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे. इंदापूरच्या २२ गावांना ५ टीएमसी आणि मोठ्या रक्कमेची तरतूद आणि मंगळवेढ्याच्या ३५ गाव योजनेसाठी मात्र २ टीएमसी आणि निधीची कमतरता, हा कुठला न्याय, असे खुपसे पाटील व माऊली हळणवर यावेळी म्हणाले.
----