उजनीची वाटचाल मंद गतीने प्लसकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:59+5:302021-07-18T04:16:59+5:30

भीमानगर : भीमा खोऱ्यातील १८ धरणांत अद्यापही समाधानकारकरीत्या पाणी साठा झालेला नाही. याचं कारण म्हणजे भीमा खोरे मोठ्या पावसाच्या ...

Ujani's journey slowly to the plus | उजनीची वाटचाल मंद गतीने प्लसकडे

उजनीची वाटचाल मंद गतीने प्लसकडे

Next

भीमानगर : भीमा खोऱ्यातील १८ धरणांत अद्यापही समाधानकारकरीत्या पाणी साठा झालेला नाही. याचं कारण म्हणजे भीमा खोरे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वरील सर्व धरणे भरल्यानंतरच उजनी धरणात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध होईल. त्यामुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात म्हणजेच भीमा खोऱ्यामध्ये केव्हा मोठा पाऊस सुरू होईल आणि उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढेल याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरचे डोंगर, मावळ भाग, लोणावळ्याचा पश्चिम भाग, तसेच नगर जिल्ह्याचा दक्षिण भाग या सर्व विभागांमध्ये अद्याप मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मुळा-मुठा, पवना, इंद्रायणी या नद्यांना पूरसदृश परिस्थिती नाही.

या नद्या पुढे भीमा नदीला येऊन मिळतात व त्यामुळे दौंड येथून उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढतो; परंतु सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस होत असला तरी उजनी धरणात मात्र अद्यापही उणे ६ टक्के पाणी आहे. अतिशय धीम्या गतीने धरणाच्या टक्केवारीची वाटचाल मायनसकडून प्लसकडे सुरू आहे. उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग खूपच कमी प्रमाणात आहे.

चालू पावसाळी हंगामाच्या सुरुवातीच्या ४६ दिवसांत उजनी धरणाच्या १८ धरणसाखळी क्षेत्रांत ६५२९ मि.मी., तर उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाळ्याच्या सुरुवातीला साधारण १५ जूनदरम्यानपर्यंत उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे २३ टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात आतापर्यंत १७.७७ टक्के वाढ होऊन ती -६.२३ टक्क्यांवर आली आहे. सध्या उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ४९०.६१० मीटर, एकूण साठा १७२१.४७ दलघमी, तर मृतसाठा उणे ९४.५६ दलघमी व टक्केवारी उणे ५ टक्के एवढी आहे.

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या ४५ दिवसांत ६५२९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यामुळे उजनी धरणात काही प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला आहे. येथून अद्याप विसर्ग सुरू झालेला नाही.

Web Title: Ujani's journey slowly to the plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.