पावसाने दडी मारल्याने उजनीचा साठा जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:14+5:302021-08-24T04:27:14+5:30
उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर; पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क भीमानगर : गेला ...
उजनीची टक्केवारी पंधरा दिवस झाले ६२ टक्क्यावर स्थिर;
पावसाने दडी मारल्याने शेतकऱी चिंताग्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
भीमानगर : गेला महिना झाला, पावसाने दडी मारल्याने पुणे जिल्ह्यातील धरण साखळीमधून येणारी पावसाच्या पाण्याची आवक पंधरा हजार क्युसेकवरून फक्त २९९९ क्युसेकवर आली आहे. त्यामुळे उजनीचा पाणीसाठा जैसे थेच राहिला आहे.
उजनीतून कालव्याला ११०० क्युसेक, सीनामाढा उपसा २५९ क्युसेक, बोगदा १५०, तर दहिगाव उपसा सिंचनमधून १२६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. दौंडमधून उजनीमध्ये २९९९ क्युसेकनी पाणी येत आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये खरिपाच्या पेरण्या केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची खरिपाची पिके जागेवर जळू लागली आहेत. शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. फक्त आभाळ येत आहे, परंतु पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जमिनीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
----