उजनीचा पाणीसाठा २० दिवसांत ३१ टक्क्यांनी घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:05+5:302021-04-10T04:22:05+5:30
२० मार्चला उजनी एकूण पाणीसाठा २७४४.५० दशलक्ष घनमीटर होता. त्याचा टीएमसी ९६.९१ टीएमसी होता तर उपयुक्त पाणीसाठा ९४१.६९ दशलक्ष ...
२० मार्चला उजनी एकूण पाणीसाठा २७४४.५० दशलक्ष घनमीटर होता. त्याचा टीएमसी ९६.९१ टीएमसी होता तर उपयुक्त पाणीसाठा ९४१.६९ दशलक्ष घनमीटर होता. त्याचा टीएमसी ३६.२५ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा होता.
१० एप्रिलला एकूण पाणीसाठा २२९५ दशलक्ष घनमीटर त्याचा ८१ टीएमसी पाणीसाठा आहे. उपयुक्त पाणीसाठा ४९२ दशलक्ष घनमीटर तर त्याचा ३२ टीएमसी पाणीसाठा आहे. उजनीची पाणीपातळी उपयुक्त ३२ वर आली आहे. म्हणजेच उजनीमधील पाणीसाठा वीस दिवसांत तीस टक्के कमी झाला आहे. भीमा नदी व दहिगाव उपसा सिंचन योजना बंद आहेत.
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणीपातळी ४९३.२७५ मीटर
एकूण पाणीसाठा २२९५.१० दलघमी (८१.०४ टीएमसी)
उपयुक्त पाणीसाठा ४९२ दलघमी (१७.३८ टीएमसी)
टक्केवारी प्लस ३१
कालवा ३१०० क्युसेक
बोगदा ९०० क्युसेक सीनामाढा २९६ क्युसेक.