उजनीचा पाणीसाठा ५० दिवसांत ४० टक्क्यांनी घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:41 AM2021-03-13T04:41:03+5:302021-03-13T04:41:03+5:30

गतवर्षी १२ मार्च २०२० ला एकूण पाणी साठा ६३ टक्के होता तर यंदा तो ६४.८२ टक्क्यावर आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची ...

Ujani's water reserves fell by 40 per cent in 50 days | उजनीचा पाणीसाठा ५० दिवसांत ४० टक्क्यांनी घटला

उजनीचा पाणीसाठा ५० दिवसांत ४० टक्क्यांनी घटला

Next

गतवर्षी १२ मार्च २०२० ला एकूण पाणी साठा ६३ टक्के होता तर यंदा तो ६४.८२ टक्क्यावर आहे. उपयुक्त पाणीसाठ्याची स्थिती गतवर्षी ३३.७६ टीएमसी तर यंदा ३४.७३ टीएमसी आहे.

चालू वर्षी उजनी धरणात १११ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर घट होऊन पाणीसाठा १०४ टक्के राहिला होता. उजनी धरणातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पाणी सुटणार असल्याने कालवा काठावरील लोकांची निराशा झाली आहे. तापमानाची तीव्रता वाढल्याने शेतातील पिकांना पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. शेतकरी पाण्याची वाट पाहात आहेत.

चालू वर्षी उजनीत १११ टक्के पाणीसाठा जमा होऊनही उजनी धरण लाभक्षेत्रात पाहिजे, त्या प्रमाणात ठिबक सिंचनचा वापर होताना दिसत नाही. ठिबक सिंचन सबसिडी मिळत नाही व ऊस या पिकाला जास्त पाणी लागत असल्याने त्यामुळे बेसुमार पाणी उपसा व त्यातच आता बाष्पीभवनात वाढ झाल्याने उजनीच्या टक्केवारीत कमालीची घट होताना दिसून येत आहे.

----

चालू वर्षी उन्हाळ्यात पाण्याची दोन रोटेशन सोडायचे की, एका पाळीवर थांबायचे अजून ठरलेले नाही. साधारणपणे दोन एप्रिलपासून पाणी सोडण्याचे संकेत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिले.

उजनीची सद्यस्थिती

एकूण पाणी पातळी ४९५.१२० मीटर

एकूण पाणीसाठा २७८६.२५ दलघमी

(९८.३८ टीएमसी)

उपयुक्त पाणीसाठा

९८३.४४ दलघमी

(३४.७३ टीएमसी)

टक्केवारी ६४.८२

फोटो

१२उजनी०१

Web Title: Ujani's water reserves fell by 40 per cent in 50 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.