उजनीत आले ३३.२५ टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 06:10 PM2017-07-25T18:10:19+5:302017-07-25T18:13:17+5:30
बेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे. उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्या
आॅनलाइन लोकमत सोलापूर
बेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे.
उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्याच्या पुढे गेले असून, दौंडमधून येणाºया विसर्गात वरचेवर घट होत आहे. रविवारी रात्री ६५ हजार ४७0 क्युसेक्स असणारा विसर्ग आज २८ हजार ७५९ वर आला आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून बंद केलेला विसर्ग सोमवारी दुपारपासून सात हजार क्युसेक्सने पुन्हा चालू केला आहे. त्यामुळे पुन्हा दौंड येथील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या ७७ टीएमसी पाण्याचा साठा असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला आहे. उजनी धरणाच्या वरील १९ धरणांपैकी खडकवासला ६ हजार ६४८ क्युसेक्स, कासारसाई ४१४, आंद्रा १ हजार १९६, वडिवळे ५६१, भामा ९२४, चासकमान ५ हजार १४५, कलमोडी ६२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून, १२ धरणांचा पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.
-----------
उजनीची पाणी पातळी
- एकूण पाणी पातळी ४९२.८00 मीटर
- एकूण पाणीसाठा २ हजार १८२ दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा प्लस ३७९.६७ दलघमी
- टक्केवारी प्लस २५.२ टक्के
- विसर्ग-दौंड २८ हजार ७५९ क्युसेक्स, बंडगार्डन २0 हजार ४९८ क्युसेक्स
---------------------
उजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !
केत्तूर : उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी व धरणाच्या काठावर असलेले साहित्य काढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे.सध्या उजनी जलाशयाच्या किनाºयावर विद्युत पंप, केबल, पाईप व इतर साहित्य वर घेण्यासाठी शेतकºयांची पळापळ सुरू आहे. पाणी वाढत असल्याने अनेक शेतकºयांचे विद्युत पंप बुडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केत्तूर नं. १ येथील तुकाराम जरांडे, अमोल जरांडे, विनोद कोकणे, हनुमंत गावडे यांच्यासह शेतकरी आपले साहित्य धरण व नदी काठावरून हलवत आहेत.