उजनीत एकाच दिवसात आले चार टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:22+5:302021-07-24T04:15:22+5:30

गेल्या ४८ तासांपासून भीमाशंकर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. ५ ऑगस्ट २०१६ मध्ये तर १७ जुलै २०१७ ...

Ujjain received four TMC of water in a single day | उजनीत एकाच दिवसात आले चार टीएमसी पाणी

उजनीत एकाच दिवसात आले चार टीएमसी पाणी

Next

गेल्या ४८ तासांपासून भीमाशंकर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. ५ ऑगस्ट २०१६ मध्ये तर १७ जुलै २०१७ ला, १७ जुलै २०१८ तर २९ जुलै २०१९ आणि १७ जुलै २०२० ला उजनी धरण प्लसमध्ये आले होते.

यावर्षीही जुलैमध्ये मायनसमधून प्लसमध्ये सलग सहा वर्षे ही वेळ साधली आहे.

अशातच पर्जन्यवृष्टी हंगामाच्या सुरुवातीला कमी-जास्त का होईना, पण समाधानकारक झाल्यामुळे पुणे, अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱी, उद्योजक व सामान्य नागरिकांसाठी उजनी धरण महत्त्वाचे आहे. उजनीची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी मृत पाणीसाठा आहे, ५३.५७ टीएमसी पाणीसाठा उपयुक्त तर जादा १० टक्क्याचे ६ टीएमसी आहे. चालू वर्षी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड तसेच अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत व सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्यामुळे पाणलोट क्षेत्रातून उजनीतून सिंचनासाठी होणारा पाणी उपसा बंद आहे.

बंडगार्डन येथून ४७,००० क्यूसेक तर दौंड येथून उजनी धरणामध्ये ६५,५०० क्यूसेक वेगाने पाणी येत आहे. यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन केल्याने उजनी मायनस पातळी -२३ टक्क्यांपर्यंत खाली आली होती. त्यामुळेच केवळ उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनी मायनसमधून प्लसमध्ये आले आहे. उजनी जलाशयाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने उन्हाळ्यात पाण्यासाठी वाढवलेले पाइप, मोटारी, केबल पाण्यात जाऊ नये, यासाठी त्या बाजूला करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उजनी काठावर व उजनी बॅकवाटरवर दिसून येत आहे.

----

सध्या उजनी धरणातील पाणीपातळी

सायंकाळी ६ वाजता..

- एकूण पाणीपातळी - ४९१.४९० मीटर

- एकूण पाणीसाठा - १८९५.६७ दलघमी

- एकूण पाण्याचा टीएमसी - ६६.९४

- एकूण उपयुक्त पाणीसाठा - ९२.८६ दलघमी

- उपयुक्त टीएमसी - ४.४४ टी.एम.सी.

- टक्केवारी - ८ टक्के

बंडगार्डन - २२,०५५

- दौंड - ६५,२४६ क्यूसेक

Web Title: Ujjain received four TMC of water in a single day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.