उजनी धरणावर २४ तासांत २ लाख ८८ हजार युनिट विजेची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 10:46 AM2018-09-18T10:46:38+5:302018-09-18T10:48:01+5:30

आतापर्यंत ४३ कोटी ६८ लाख युनिट वीजनिर्मिती

On the Ujni dam, 2 lakh 88 thousand units of electricity generated in 24 hours | उजनी धरणावर २४ तासांत २ लाख ८८ हजार युनिट विजेची निर्मिती

उजनी धरणावर २४ तासांत २ लाख ८८ हजार युनिट विजेची निर्मिती

Next
ठळक मुद्देया प्रकल्पासाठी लागणाºया पाण्याच्या पंपिंगसाठी १६ मेगावॅट वीज लागतेउत्पादित होणारी १२ मेगावॅट वीज ३ रूपये युनिटने विकली जातेहा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला

प्रदीप पाटील 

भीमानगर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या निर्मितीनंतर याच धरणावर मे १९९४ रोजी वीज प्रकल्प कार्यान्वित झाला. वीज निर्मितीसाठी वापरलेले पाणी परत धरणात पाणी सोडले जाते. एका तासाला १२ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, यासाठी १ हजार ६०० क्युसेक पाण्याची आवश्यकता आहे. २४ तासांत दोन लाख ८८ हजार युनिट वीज निर्मिती होत असून, रिव्हर्स प्लांट (पाणी परत धरणात सोडले जाते) असल्याने वर्षात तीन ते चार महिनेच हा प्रकल्प चालतो. या कालावधीत दोन कोटी २० लाख युनिट एवढी वीज निर्मिती होत असून, निर्मितीपासून ३१ मे २0१८ पर्यंत या प्रकल्पातून ४३६.८३ मिलियन युनिट्स म्हणजेच ४३ कोटी ६८ लाख युनिट इतकी वीज निर्मिती झाली आहे.

राज्यात असे विविध ठिकाणी चार प्रकल्प असून, यात उजनी वीज निर्मिती प्रकल्पाचा समावेश आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या जलविद्युत विभागाच्या मालकीचा असून, हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडे भाडेतत्त्वावर हस्तांतरित केला आहे. अशा प्रकारचा रिव्हरसेबल प्लांट महाराष्ट्रात जायकवाडी येथे १२ मेगावॅट, भाटघर येथे २५ मेगावॅटचे दोन संच कार्यरत आहेत, असे चार प्लांट आहेत. या प्रकल्पाची खोली जमीन लेव्हलपासून शंभर फूट खोलीवर असून, टर्बाईनच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते. भीमानगर येथील वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण होणारी वीज इंदापूर येथे १३२ केव्ही सबस्टेशनला जोडली आहे. तेथून वालचंदनगरला वीज पुरवली जाते व भीमानगर येथून सीना-माढा पंपहाऊसलादेखील वीज पुरवठा केला जाऊ शकतो. त्यासाठी भीमानगर इथे तशी व्यवस्था केली आहे.

या प्रकल्पासाठी लागणाºया पाण्याच्या पंपिंगसाठी १६ मेगावॅट वीज लागते व निर्मिती होते १२ मेगावॅट. परंतु पंपिंगला १६ मेगावॅट वीज ही एक रूपये युनिटने मिळते व उत्पादित होणारी १२ मेगावॅट वीज ३ रूपये युनिटने विकली जाते.

Web Title: On the Ujni dam, 2 lakh 88 thousand units of electricity generated in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.