उजनीने धरणातील पाणीसाठ्याने ओलांडला १०० टीएमसीचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:54 AM2018-08-23T10:54:24+5:302018-08-23T10:55:39+5:30
उजनी धरणातील पाणीसाठ्याने बुधवारी सायंकाळी १०० टीएमसीचा टप्पा ओलांडला.
सोलापूर / भीमानगर : उजनी धरणातीलपाणीसाठ्याने बुधवारी सायंकाळी १०० टीएमसीचा टप्पा ओलांडला. पुणे जिल्ह्यातून ६० हजार १६५ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी आठ वाजता ७५ टक्के इतका झाला आहे.
मागील महिनाभरापासून पुणे जिल्ह्यातून पाणी उजनी धरणात येत आहे. त्यात सातत्याने वाढच होत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणातील एकूण पाणीसाठा १००. ७६ टीएमसी इतका झाला होता.
धरणातील पाणीसाठा सायंकाळी आठ वाजता ७५ टक्क्यांवर पोहोचला होता. पुणे जिल्ह्यातून असाच प्रवाह राहिला तर धरणाचे दरवाजे उचलून नदीत पाणी सोडावे लागणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी वजा २७ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. ती आता अधिक ७५ टक्क्यांवर पोहोचली आहे. म्हणजे धरणात १०० टक्के पाणी आले आहे.
कॅनॉलला पाणी सोडण्याची गरज
- उजनी धरणाचे पाणी कॅनॉलला सोडण्याची मागणी वाढली आहे. दोन वर्षांखाली जिल्ह्यात पाऊस कमी पडला होता. त्यावेळी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी कालव्याद्वारे जिल्हाभरात सोडून लहान-मोठे बंधारे, ओढे, ओढ्यावरील बंधारे व काही तलावही भरुन घेतले होते. अशाच पद्धतीने याहीवर्षी कालव्यातून पाणी सोडणे शक्य असेल त्या ठिकाणचे तलाव, बंधारे व ओढ्यावरील बंधारे भरुन घेण्याची मागणी होत आहे. सीना नदीच्या पुढे कारंबा सावळेश्वर जलसेतू परिसरात पाण्याची मागणी होत आहे.
पुणे जिल्हा धरणातील पाणीसाठा...
- -पिंपळगाव जोगे- ४५.७८ टक्के
- -माणिकडोह- ६६.१२ टक्के
- -येडगाव- ९६.६६ टक्के
- -वडज-८१.७० टक्के
- च्डिंभे- ९५.५८ टक्के
- -घोड- ९२.२७ टक्के
- -विसापूर- १०.७४ टक्के
- -कलमोडी- १०० टक्के
- -चासकमान-१०० टक्के
- -भामा आसखेड- १०० टक्के
- -वडीवळे- १०० टक्के
- -आंध्र- १०० टक्के
- -पवना- १०० टक्के
- -कासारसाई-९८.६७ टक्के
- -मुळशी- १०० टक्के
- -टेमघर- ६२.७३ टक्के
- -वरसगाव- १०० टक्के
- -पानशेत- १०० टक्के
- -खडकवासला-१०० टक्के
उपयुक्त पाणी पातळी- १११९.३७
एकूण पाणीसाठा- ७४ टक्के
एकूण पाणी- १०३.१८ टीएमसी
उपयुक्त पाणी- ३९.५३ टीएमसी
बंडगार्डन विसर्ग ३६,१७८ क्युसेक्स
दौंड विसर्ग ६०,१६५ क्युसेक्स.
कालवा विसर्ग २००० क्युसेक्स
बोगदा ९०० क्युसेक्स