दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:43 PM2018-07-09T12:43:24+5:302018-07-09T12:44:40+5:30

In the Ujni dam from Daund 1, 4, 482, the water released | दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले

दौंडमधून उजनी धरणात १, ४८२ चा विसर्गाने पाणी सोडले

Next
ठळक मुद्देपावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही अद्याप दमदार पाऊस झाला नाहीपुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधारसीना बोगद्यातून पाणी सोडण्याची  मागणी

भीमानगर : पुणे परिसरात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड येथून ९८८ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर यात वाढ होऊन १ हजार ४८२ क्युसेक्सने विसर्ग उजनी धरणात सोडण्यात येत आहे. 

पावसाळा सुरू होऊन महिना लोटला तरीही अद्याप दमदार पाऊस झाला नाही. यामुळे पावसाबरोबरच धरण कधी भरेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अद्यापही पुणे येथील धरण क्षेत्रात पाहिजे त्या प्रमाणात पाऊस पडत नाही. राज्यात मुंबई, विदर्भ, कोकण या भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे; मात्र पुणे येथील धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही.

उजनीच्या वरच्या बाजूला जवळपास १८ ते १९ धरणे असून अजूनही या क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाळा अजूनही तीन ते साडेतीन महिने असून हवामान खात्याने चालूवर्षी समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला आहे. तरीही पाऊस पडत नसल्याने उजनीतून नदी, कालवा, सीना बोगद्यातून पाणी सोडण्याची  मागणी येत्या काही दिवसात शेतकरी वर्गातून होणार आहे. 

उजनीची सध्यस्थिती
- एकूण पाणी पातळी ४८९.५५० दलघमी
- एकूण पाणीसाठा १५३०.२० दलघमी
- उपयुक्त पाणीसाठा -२६२.६१ दलघमी
- टक्केवारी -१७.९७ टक्के 
- दौंड येथून धरणात विसर्ग १,४८२ क्युसेक्स

Web Title: In the Ujni dam from Daund 1, 4, 482, the water released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.