उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार
By Appasaheb.patil | Updated: December 26, 2023 15:29 IST2023-12-26T15:29:39+5:302023-12-26T15:29:46+5:30
सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मोठया प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यापर्यंत घसरले आहे.

उजनीची पाणीपातळी १७.६९ टक्क्यावर; जानेवारीतच मायनसमध्ये जाणार
सोलापूर : सोलापूरची वरदायिनी म्हणून ओळख असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मोठया प्रमाणात घट होत आहे. मागील वर्षी १०७.०६ टक्के असलेले उजनी धरण यंदाच्या वर्षी १७.६९ टक्क्यापर्यंत घसरले आहे.
यंदा उजनी धरण क्षेत्रात व सोलापूर जिल्ह्यात म्हणावा तसा समाधानकारक पाऊस झाला नाही. शिवाय आषाढी, कार्तिक यात्रेसाठी पाणी सोडण्यात आले. शिवाय बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत घट झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या उजनी धरणात आजचा पाणीसाठा ७३.१४ टीएमसी एवढा आहे. धरणातील बोगदा विसर्ग - ३०० क्युसेस तर मुख्य कालवा विसर्ग १००० क्युसेस आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन घट ०.७० द.ल.घ.मी. एवढा असून धरणातील घट व वाढ -६.६८ द.ल.घ.मी एवढा आहे.
१ जूनपासून आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यात फक्त ४६१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. आगामी काळातील पाणीटंचाई पाहता जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात येत आहे. याशिवाय अन्य मार्गाने टंचाईवर मात कशी करता येईल याबाबतचाही विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे.