कागदपत्रे आणण्याच्या बहाण्याने वाहने सोडून पळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:50 AM2021-02-05T06:50:17+5:302021-02-05T06:50:17+5:30
वैराग : बार्शी रोडवर ट्रकमधून काढून जीपमध्ये डिझेल भरत असताना चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तीन ...
वैराग : बार्शी रोडवर ट्रकमधून काढून जीपमध्ये डिझेल भरत असताना चोरीच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. तीन ट्रक आणि एक जीप असा ५० लाखांचा ऐवज जप्त केला. रस्त्यावर डिझेल भरणे चालक व मालकाला महागात पडले आहे. दरम्यान गाड्या स्वत:च्याच असल्याची कागदपत्रे आणण्याच्या बहाण्याने आरोपींनी पळ काढला आहे.
३१ जानेवारी रोजी ही घटना घडली असून याप्रकरणी वैराग पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बार्शी रस्त्यावर उसाच्या रिकाम्या ट्रकमधून काहीजण डिझेल काढून बोलेरो गाडीत भरत होते. यावेळी एका सामाजिक कार्यकर्त्यास गाड्यांच्या नंबर प्लेटवरुन संशय बळावला. त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. यावरून पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. एम. एच.१९ जे.३६१५ व एम एच १७ - ७०६९ क्रमांकाच्या दोन ट्रक व जीप( एम. एच. १६ ए. टी. ६३) ही तीन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
दरम्यान गाडी चालकांनी गाड्या स्वत:च्या मालकीच्या असून त्याची कागदपत्र घेऊन येतो असे सांगून पोलीस ठाण्यातून पलायन केले.
आरटीओकडे मागितली माहिती
ही वाहने मराठवाड्यातील गेवराई भागातील आहेत. ऊस तोडीसाठी टोळी प्रमुखांनी वैराग भागात ही वाहने आणली. चोरीच्या प्रकारात ही वाहने लांब ठिकाणी वापरण्याचा हेतू असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
तपासणीत ही चारही वाहने ही वयोमर्यादेची मुदत संपलेली, आरसीबुक, मालकी, लायन्सन, विमा संरक्षण, प्रदूषण चाचणी रिपोर्ट बाबत संशयास्पद असून याची चौकशी चालू केली आहे. या गाड्यांचे चेसी नंबर उपप्रादेशिक विभाग सोलापूर यांच्याकडे पाठवले आहेत.
फोटो : ०३ वैराग
बार्शी रोडवर डिझेल काढण्याचा प्रयत्न काही लोक करत असताना वैराग पोलिसांनी जप्त केलेली वाहने