भुयारी गटारीची कामे निकृष्ट.. मुख्याधिकारी, नगरसेवकासह ठेकेदारावर गुन्हे नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:21 AM2021-03-26T04:21:58+5:302021-03-26T04:21:58+5:30

निवेदनात म्हटले आहे की, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून ते जलद गतीने केले ...

Underground sewerage works are inferior | भुयारी गटारीची कामे निकृष्ट.. मुख्याधिकारी, नगरसेवकासह ठेकेदारावर गुन्हे नोंदवा

भुयारी गटारीची कामे निकृष्ट.. मुख्याधिकारी, नगरसेवकासह ठेकेदारावर गुन्हे नोंदवा

Next

निवेदनात म्हटले आहे की, शहरात होत असलेल्या भुयारी गटारीचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून ते जलद गतीने केले जात आहेत. दहा महिने झाले येथील नागरिकांना कामामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा त्रास होत आहे. त्यावर नगरपालिका काही उपाययोजना राबवत नाही. विकासकामांच्या नावाखाली कुर्डूवाडीकरांना त्रास होत आहे. काम चालू असताना कोणताही अधिकारी किंवा नगरसेवक, ठेकेदार कामाच्या ठिकाणी फिरकत नाहीत. मनमानी पद्धतीने काम चालू आहे. नियोजनाअभावी सतत नळ कनेक्शन तोडले जात आहेत. त्याची दुरुस्ती लवकर होत नाही. याची लवकर दखल घ्यावी अन्यथा मनसे स्टाइलने हे चालू काम बंद पाडू, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर शहराध्यक्ष ओंकार चौधरी, गणेश चौधरी, आकाश लांडे, युवराज कोळी, अमोल घोडके,सागर बंदपट्टे, सोमनाथ पवार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी मला अंतर्गत गटारी बाबतच्या तक्रारीचे निवेदन दिले आहे. नगरपालिका त्या संबंधित कामाचे थर्ड पार्टी ऑडिट करणार आहे. त्यावेळी जर काम निकृष्ट वाटले तर त्यावर कारवाई केली जाईल व बिलही थांबवले जाईल.

- समीर भूमकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, कुर्डूवाडी

२५ कुर्डूवाडी-गटारी

कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी जोती कदम यांच्याकडे नगरपालिकेच्या भुयारी गटारीच्या कामाबद्दल लेखी निवेदन देताना मनसेचे पदाधिकारी.

---

Web Title: Underground sewerage works are inferior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.