ऊस वाहतूकदारांना गांधीगिरी करून समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:18+5:302020-12-26T04:18:18+5:30
सध्या सर्व रस्त्यांवर बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रकद्वारे ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. टेपरेकॉर्डरचा मोठा आवाज, ...
सध्या सर्व रस्त्यांवर बैलगाडी, ट्रॅक्टर व ट्रकद्वारे ऊस वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. टेपरेकॉर्डरचा मोठा आवाज, ट्रॅक्टरच्या हेडला केलेले अनावश्यक डेकोरेशन व विनापरवानाधारक चालकांनी बेफामपणे केलेली वाहतूक या सर्व गोष्टी कारणीभूत आहेत. हे सर्व प्रकार टाळून जबाबदारीने एका कारखान्याचे वाहतूक, ठेकेदार मालक /चालक राहुल खराडे यांचा पानगाव येथील युवकांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी अनुरोध मोरे, पृथ्वीराज देशमुख, चेतन मोरे, स्वप्नील मोरे, उदय मोरे यांनी चालकास समजावून सांगितले.
ट्रॅक्टरच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
२५ रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास पानगाव येथील कळंबवाडी रोड चौकात वेगाने आलेल्या एमएच १३ सीएस ६३६८ या ऊस वाहतूक ट्रॅक्टरने बार्शीहून कळंबवाडीकडे जाणाऱ्या एमएच १३ एव्ही ५७३९ या दुचाकीला धडक दिली. यामध्ये इम्रान युनूस सय्यद (वय ३२, रा. बार्शी) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पळून गेला.
फोटो
२५पानगाव ०१