कुर्डूवाडी आगारातील लांब पल्ल्याच्या गाड्या पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:21 AM2021-02-12T04:21:20+5:302021-02-12T04:21:20+5:30
: कुर्डूवाडी आगातील एस.टी बस कोरोनामुळे असलेल्या बसेस दैनंदिन उत्पन्न सुमारे ५ लाख ५९ हजार व महिन्याकाठी ...
: कुर्डूवाडी आगातील एस.टी बस कोरोनामुळे असलेल्या बसेस दैनंदिन उत्पन्न सुमारे ५ लाख ५९ हजार व महिन्याकाठी सरासरी सुमारे १ कोटी ४० लाख इतके होत आहे. सध्या आता प्रतिदिन ४ लाख ३० हजार ते ४ लाख ७५ हजारापर्यंत उत्पन्न वाढले आहे. आता आगाराचे उत्पन्न पूर्वपपदावर येत असून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू झाल्या आहेत. ग्रामीण भागातीलही ३५ टक्के बसेस सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती कुर्डुवाडी आगाराचे व्यवस्थापक मिथुन राठोड यांनी दिली.
राठोड म्हणाले, कुर्डूवाडी आगारातील सध्या एकुण बसेसची संख्या ४६ असून यापैंंकी ४ बसेस या मुंबई येथील बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या वाहतुकीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. शिल्लक ४२ बसेसपैकी लांब पल्याच्या १४ बसेसद्वारे ५ हजार ६७ किमीच्या १४ फे-या, मध्यम पल्ल्याच्या २४ फे-या व ग्रामीण भागाच्या १२२ फे-या सुरू आहेत. या आगारात एकुण चालक संख्या ही ११९ व वाहक संख्या १०८ इतकी आहे. ग्रामीण भागातील सध्या ३५ टक्के फे-या सुरू असून आता १५ टक्के फे-या सुरू करण्याचे बाकी आहे.
लॉकडाऊनच्या पूर्वी आगाराची ५५ नियते चालू होते. परंतु सध्या ४३ नियते चालू असून यामध्ये बोरवली, पुणे, उदगीर, माजलगाव, औरंगाबाद, नगर, सातारा, परभणी या लांब पल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुरू केल्या आहेत. त्याने आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. त्याचबरोबर तोटा झालेला भरून काढण्यासाठी धार्मिक स्थळांसाठी येथून पॅकेज टुर्स सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांनींचे पासेस
सध्या शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनीना अहिल्यादेवी होळकर सवलत योजनेंतर्गत आतापर्यंत ३८६ फ्री पासेस देण्यात आले आहे. ग्रामपंचायत व मुख्याध्यापक यांच्या मागणीनुसार शालेय फे-यात वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वय वर्ष ६५ वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू आहे. या योजनेत ज्या नागरिकांनी नोंदणी करून पावत्या घेतल्या आहेत. त्यांनी स्मार्ट कार्ड आगारातून घेऊन जावेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी सवलत पास स्मार्ट कार्डची नोंदणी केली आहे. त्यांनीही कार्ड घेऊन जावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.