महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांचा बेमुदत संप; विद्यापीठाच्या प्रात्यक्षिक परीक्षा पडल्या बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 02:48 PM2019-03-06T14:48:16+5:302019-03-06T14:50:37+5:30
सोलापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी पाच मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या ...
सोलापूर : महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या आदेशानुसार राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाºयांनी पाच मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला मंगळवारी प्रारंभ झाला.
संपाच्या पहिल्याच दिवशी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाºया प्रात्यक्षिक परीक्षा बंद पडल्याचा दावा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने केला आहे़ या संपात सोलापूर शहर व जिल्ह्यातील २० अनुदानित महाविद्यालयांतील १०० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. ग्रामीण भागातून ९५ तर शहरातून ७५ टक्के कर्मचाºयांचा प्रतिसाद मिळाला आहे.
शहरातील शिक्षकेतर कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र गोटे, सरचिटणीस अजित संगवे (वालचंद), उपाध्यक्ष दत्ता भोसले (छत्रपती शिवाजी रात्र), खजिनदार नियाझ शेख (लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय ), विठ्ठल कोळी व डी. जे. करजगीकर ( संगमेश्वर), व्ही. एम. गाजूल व एस. एन. सादूल ( अे़ आऱ बुुर्ला महिला), कय्युम पठाण ( युनियन महिला) यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी १० ते १२ या वेळेत निदर्शने केली.
त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार नागनाथ माळवदकर यांना देण्यात आले. ग्रामीण भागातील कर्मचाºयांनी कार्याध्यक्ष राजेंद्र गिड्डे, उपाध्यक्ष हणमंत खपाले, माणिक लिगाडे, सहचिटणीस राजेंद्र नरूने व हरिदास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या महाविद्यालयासमोर निदर्शने केली. त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन दिले. बेमुदत संप मिटेपर्यंत शहरातील महाविद्यालयांतील शिक्षकेतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोज सकाळी १० ते १२ या वेळेत निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती कर्मचारी संघटनेने दिली़