वर्गणीमुक्त शिवजन्मोत्सव साजरा करण्याचा एकमुखी निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:14+5:302021-01-16T04:25:14+5:30
कोरोनामुळे अनेक महिने लॉकडाऊन असल्याने सर्व व्यापार ठप्प होता. याचा परिणाम सर्वच घटकांवर झालेला आहे. सध्या सर्वत्र परिस्थिती पूर्व ...
कोरोनामुळे अनेक महिने लॉकडाऊन असल्याने सर्व व्यापार ठप्प होता. याचा परिणाम सर्वच घटकांवर झालेला आहे. सध्या सर्वत्र परिस्थिती पूर्व पदावर आलेली असली तरी अनेक महिन्यांपासून व्यापार, रोजगार बंद आहे. त्यामुळे या वर्षात सर्वांनाच मोठा आर्थिक फटका बसलेला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जनता त्रस्त असताना मागील अनेक वर्षांपासून मंडळाला नियमितपणे वर्गणी देणाऱ्या तसेच इतर कोणाकडूनही एकही रुपया वर्गणी घेणार नसल्याचे मंडळाच्या बैठकीत ठरले; परंतु यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड केली. तसेच प्रतिष्ठानचे खजिनदार सदानंद गरड यांनी अहवाल सादर केला.
मंडळाची कार्यकारिणी
अध्यक्ष अभिजित हांडे, उपाध्यक्ष मोहित मस्तूद, खजिनदार शंकर (पप्पू) चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.