सोलापूर जिल्ह्यातील पावणेचार लाख हेक्टरसाठी पिकांचा उतरविला विमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 14:49 IST2019-08-02T14:48:36+5:302019-08-02T14:49:52+5:30
शेतशिवार; जिल्ह्यातील सव्वापाच लाख शेतकºयांनी भरली रक्कम

सोलापूर जिल्ह्यातील पावणेचार लाख हेक्टरसाठी पिकांचा उतरविला विमा
अरुण बारसकर
सोलापूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ५ लाख २४ हजार ७५६ शेतकºयांनी विविध पिकांचा विमा उतरविला आहे. तांत्रिक अडचणीमुळे पीकविमा भरण्यास होणारा विलंब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीकविमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आली होती.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर आदी पिकांचा पीकविमा उतरविला असून विमाहप्त्यापोटी शेतकºयांनी हिश्याचे १७ कोटी ५७ लाख ९१ हजार रूपये भरले आहेत़ गतवर्षी जवळपास २ लाख ५६ हजार शेतकºयांनी पीकविमा भरला होता़ संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविली आहे़ त्यामुळे शेतकºयांवर अस्मानी संकटाचे मोठे सावट असून प्ोरलेलं अद्यापपर्यंत उगवलेलं नाही़
विमा संरक्षण कोणाला?
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकºयांना विमा संरक्षण मिळणार. जुलै ही पीकविमा भरण्याची अंतिम मुदत होती. पण, यासाठी येणाºया तांत्रिक अडचणी, पोर्टलमध्ये वारंवार उद्भवणाºया त्रुटी आणि बँकानी पीकविमा भरून घेण्यास होत असलेला विलंब यामुळे सेतु सुविधा केंद्रावर होणारी शेतकºयांची गर्दी लक्षात घेऊन ३१ जुलैपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली.
विमा हप्ता किती?
खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकºयांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकºयांना भरावा लागणार आहे.