केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग पंढरपुरात दाखल; विठ्ठलाचे घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 02:22 PM2021-11-08T14:22:25+5:302021-11-08T14:24:44+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Union Minister Nitin Gadkari, V. K. Singh admitted to Pandharpur; Darshan of Vitthal | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग पंढरपुरात दाखल; विठ्ठलाचे घेतले दर्शन

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, व्ही. के. सिंग पंढरपुरात दाखल; विठ्ठलाचे घेतले दर्शन

googlenewsNext

सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व व्ही. के. सिंग हे पालखी मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. तत्पुर्वी गडकरी व सिंग यांनी पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. जयसिध्देश्वर महास्वामी, आ. प्रशांत परिचारक, आ. समाधान आवताडे, आ. सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. राम सातपुते, आ. सचिन कल्याणशेट्टी आदी मान्यवर उपस्थित आहेत. 

नितीन गडकरी व व्ही. के. सिंग यांचे पंढरपुरात आगमन झाले. त्यानंतर गडकरी यांच्या गाड्यांचा ताफा पंढरपुरातील विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ झाला. मंदिरात मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी गडकरी यांचे स्वागत केले. त्यानंतर गडकरी व व्ही. के. सिंग यांनी संपूर्ण मंदिराची पाहणी करून विठ्ठल-रूक्मिमी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर गडकरी यांचा ताफा पंत नगरीकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

 केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोमवार, ८ नाोव्हेंबर रोजी पंढरपूर दौऱ्यावर आहेत. या दिवशी ते पालखी मार्गाच्या कामाचे भूमीपूजन करणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंव्दारे जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पालखी मार्गाचे व्हर्च्युअल भूमीपूजन होणार आहे. दिवेघाट ते मोहोळ हा संत ज्ञानेश्वार महाराज पालखीमार्ग २२१ किमी, तर १३० किमी संत तुकाराम महाराज पालखी मार्ग हा पाटस ते तोंडले-बोंडले असा असणार आहे.

Web Title: Union Minister Nitin Gadkari, V. K. Singh admitted to Pandharpur; Darshan of Vitthal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.