विद्यापीठ परीक्षांचे नियोजन करणार; पण आधी उपमुख्यमंत्र्यांकडून आश्वासन हवं
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 16, 2023 07:28 PM2023-02-16T19:28:22+5:302023-02-16T19:28:39+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत परीक्षा कामकाजात सहभागी होणार नसल्याचा इशारा विद्यापीठ कर्मचारी संघटनेने दिला आहे.
सोलापूर : विद्यापीठांच्या परीक्षांचे नियोजन कोलमडले आहे. जोपर्यंत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत परीक्षा कामकाजात सहभागी होणार नसल्याचा इशारा विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघटनेने दिला आहे.
विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुरुवारचा एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी झाला असून यात सोलापूर विद्यापीठ आणि शहर व जिल्ह्यातील ३७ अनुदानित महाविद्यालयांतील ७५० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या गेटसमोर निदर्शने केली. आंदोलनाचा पुढील टप्पा २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपाचा आहे.
मुंबईत, बुधवारी संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत सकारात्मक निर्णय न झाल्याने कर्मचारी अद्याप संपाच्या भूमिकेत आहेत.