अक्कलकोटमध्ये तुरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने उभे पीक जाळले!

By admin | Published: April 1, 2017 05:38 PM2017-04-01T17:38:39+5:302017-04-01T17:38:39+5:30

.

Unkalkot did not have any bhav, the farmer burnt the crop! | अक्कलकोटमध्ये तुरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने उभे पीक जाळले!

अक्कलकोटमध्ये तुरीला भाव नसल्याने शेतकऱ्याने उभे पीक जाळले!

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : तुरीला भाव नसल्यामुळे १० एकर उभ्या पिकाला आग लावण्याची नामुष्की महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या बासलेगावच्या शेतकऱ्यावर आली आहे. अक्कलकोट तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी शशिकांत बिराजदार यांनी आपल्या शेतातील १० एकर तुरीच्या पिकाला अक्षरश: आग लावली. काढणीचा खर्च व अडतीचे खर्च याचा ताळ-मेळ बसत नसल्यामुळे पिकाची काढणी न करता उभे पीक जाळून टाकण्याचा निर्णय शशिकांत यांनी घेतला. वर्षभर ज्या शेतीची निगा राखली तीच शेती पेटवण्याची दुदैर्वी वेळ शेतकऱ्यांवर आली.
शशिकांत बिराजदार सधन शेतकरी आहेत. अक्कलकोट तालुक्यातल्या बासलेगावच्या पंचक्रोशीत ते आपल्या प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहेत. खरीप पिकामध्ये दरवर्षी साधारण १५० ते २०० क्विंटल तूर उत्पादन ते घेतात. यावषीर्ही त्यांनी आपल्या शेतात २६ एकर तूर पेरल त्यापैकी १६ एकराची रास करून उत्पादनही घेतले. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी अडतीला पाठवले. परंतु, अजूनपर्यंत तूर विकली गेली नाही.
३५०० ते ४२०० पर्यंत त्यांच्या तुरीला मागणी होती. परंतु शासनाने ५१०० रुपये हमी दराने विकत घ्यायचे धोरण जाहीर केल्यामुळे त्यांनी त्याची विक्री केली नाही. काढणीपासून विक्रीपर्यंतच्या प्रक्रियेत होणारा खर्च याचा कुठेच ताळमेळ लागत नाही याची खात्री पटली आणि आपल्या १० एकराच्या तूर शेतीला त्यांनी आग लावली. प्रयोग म्हणून केलेली तूर शेती त्यांच्या अंगलट आली.
गेल्यावेळी मिळालेला तुरीचा चांगला भाव पाहून त्यांनी तूर लावली. पण हळूहळू तुरीचे दर कोसळत गेले आणि बिराजदार यांच्यावर उद्विग्न मनस्थितीतून आपल्याच शेताला आग लावण्याची अगतिकता आली.. अक्कलकोट तालुक्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगलेच नुकसान सहन करावे लागले आहे. हमीभाव देण्याच्या आणि तूर विकत घेण्याच्या शासकीय यंत्रणेवर आता शेतकऱ्यांचा विश्वास उरला नसल्याचे दिसत आहे.

Web Title: Unkalkot did not have any bhav, the farmer burnt the crop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.