पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी विशाल मलपे यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:58 PM2018-01-25T14:58:54+5:302018-01-25T15:00:55+5:30
पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांनी राजीनामा दिल्याने नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २५ : पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सुजाता बडवे यांनी राजीनामा दिल्याने नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पद रिक्त झाले होते. या उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक गुरूवार २५ जानेवारी २०१८ रोजी झाली़ मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्दशन पत्र स्विकारले. विहीत मुदतीत नगरसेवक विशाल दगडु मलपे यांचे एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाले. सभागृहामध्ये झालेल्या सभेमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा साधनाताई नागेश भोसले यांच्याकडे विशाल दगडु मलपे यांचे एकच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्याने विशाल दगडु मलपे हे उपाध्यक्ष पदासाठी निवडुन आल्याचे पिठासीन अधिकारी यांनी घोषीत केले. यावेळी पक्षनेते अनिल अभंगराव सर यांनी नुतन उपाध्यक्ष विशाल मलपे यांचा सत्कार केला. निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी मुख्याधिकारी अभिजीत बापट, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी व सभा लिपीक राजाभाऊ देशपांडे यांनी कामकाज पाहिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास अभ्यंकर, नगरसेवक दगडु धोत्रे, वामन बंदपट्टे, विक्रम शिरसट, शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, संजय निंबाळकर, अनुसया शिरसट, सुजाता बडवे, रेहाना बोहरी, सुजित सर्वगोड, प्रशांत शिंदे, भाग्यश्री शिंदे, रंजना पवार, लतिका डोके, अर्चना रानगट, विवेक परदेशी, रेणुका घोडके, मालन देवमारे, ऋषीकेश उत्पात, नरसिंह शिंगण, दत्तात्रय कवठेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते बसवेश्वर देवमारे, संभाजी भोसले, शंकर पवार, भाऊसाहेब नाईक व इसबावी भागातील नागरीक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.