विनापरवाना गर्दी भोवली; बिज्जू प्रधानेसह पाच जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 05:01 PM2022-02-22T17:01:27+5:302022-02-22T17:01:39+5:30

राष्ट्रवादीत प्रवेश करताच बिज्जू प्रधाने याच्यावर गुन्हा दाखल

Unlicensed crowd around; Five persons, including Bijju Pradhan, have been booked in Solapur | विनापरवाना गर्दी भोवली; बिज्जू प्रधानेसह पाच जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल

विनापरवाना गर्दी भोवली; बिज्जू प्रधानेसह पाच जणांवर सोलापुरात गुन्हा दाखल

Next

सोलापूर : विनापरवाना गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिज्जु प्रधाने यांच्यासह पाच जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाळे येथे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असून यासाठी प्रधाने व इतर चार असे एकूण पाच जणांनी याने पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. पोलीस प्रशासनाने फक्त ५० जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली होती. पण सोमवारी सायंकाळी मात्र बाळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमविल्याप्रकरणी बिज्जु प्रधाने, सुभाष डांगे, मारुती तोडकर, नागनाथ क्षीरसागर, मदन क्षीरसागर यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

महापालिका आयुक्त आणि पोलिसांच्या आदेशानुसार रात्री १० नंतर कार्यक्रमांना बंदी आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत रात्री ८ वाजता बाळे येथे राष्ट्रवादी प्रवेशाचा कार्यक्रम ठरला होता. परंतु, जयंत पाटील यांचा मोहोळमधील कार्यक्रम रात्री पावणे दहाच्या सुमाराला संपला. यानंतर ते अनगर येथे भोजनासाठी गेले. रात्री १० वाजले तरी बाळे येथील मंचावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणे सुरूच होती. कितीही उशीर होऊ द्या. मी कार्यक्रमाला येणारच असा निरोप जयंत पाटील यांनी पाठविल्याचे मंचावरुन सांगण्यात येत होते. रात्री १२ वाजता जयंत पाटील यांचे बाळे येथे आगमन झाले. रात्री १२ वाजता डिजेवर राष्ट्रवादीचे गाणे वाजविण्यात आले. सव्वा बाराच्या सुमाराला भाजप कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नेत्यांची भाषणे झाली. यानंतर बंदोबस्तासाठी थांबलेल्या पोलिसांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 

Web Title: Unlicensed crowd around; Five persons, including Bijju Pradhan, have been booked in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.