बिनविरोध ग्रामपंचायतींना लवकरच प्रत्येकी तीन लाखाचा निधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:22 AM2021-01-25T04:22:34+5:302021-01-25T04:22:34+5:30
ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना ३ लाख रुपयांचा विकास निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याची घोषणा ग्रामपंचायत निवडणुका लागण्यापूर्वी ...
ज्या ग्रामपंचायती बिनविरोध होतील त्या ग्रामपंचायतींना ३ लाख रुपयांचा विकास निधी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देण्याची घोषणा ग्रामपंचायत निवडणुका लागण्यापूर्वी कांबळे यांनी केली होती. जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींपैकी ६७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या होत्या. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना ३ लाख रुपयांचा प्रोत्साहनपर विकास निधी कुठून उपलब्ध करून देणार, असा थेट प्रश्न केला असता अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते वाहून गेले आहेत. बिनविरोध ग्रामपंचायतींना जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती सुधारणा, पाणी पुरवठा, बांधकाम या हेडखालील निधी देण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
----शासनाच्या निधीसाठी आठवड्यातून मुंबई वारी.---
कोरोना व ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे मागील वर्षभरापासून जिल्हा परिषदेची विकास कामे ठप्प आहेत. विकास कामांना गती देण्यासाठी व राज्य शासनाचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आठ दिवसातून एक वेळेस आपण मुंबईची वारी करणार आहे. या वारीत मंत्रालयातील संबंधित मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून जिल्हा परिषदेसाठी अधिकाधिक विकास निधी आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
---