अचाट कल्पना अखेर मूर्त स्वरुपात साकारली; पाच रुपयात धावते २५ किलोमीटर सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:00+5:302021-09-05T04:27:00+5:30

भागवत वाघ वैराग : माणूस वयाने लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत. त्याची कल्पनाशक्ती अचाट असली की, ...

The unstoppable idea finally materialized; A 25 km cycle runs for five rupees | अचाट कल्पना अखेर मूर्त स्वरुपात साकारली; पाच रुपयात धावते २५ किलोमीटर सायकल

अचाट कल्पना अखेर मूर्त स्वरुपात साकारली; पाच रुपयात धावते २५ किलोमीटर सायकल

Next

भागवत वाघ

वैराग : माणूस वयाने लहान असो की मोठा, गरीब असो की श्रीमंत. त्याची कल्पनाशक्ती अचाट असली की, खूप काही करता येतं. शेळगावचा रँचो संकेत परमेश्वर गायकवाड या दहावीत शिकणाऱ्या मुलानं जुन्या सायकलला बॅटरी बसवून ती चालवण्याचा यशस्वी जुगाड केला आहे. ही सायकल १२० किलो वजन वाहू शकते आणि ती एकदा चार्जिंग झाल्यानंतर पाच रुपये खर्चात २५ किलोमीटर धावू शकते.

शेळगाव जेमतेम दोन-अडीच हजार लोकसंख्येचं गाव. इथल्या लक्ष्मणराव गायकवाड हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकणाऱ्या संकेतने जुनी वापरात असलेल्या सायकलीला शेतात फवारायच्या जुन्या पंपाच्या चार्जिंगच्या दोन बॅटऱ्या बसवल्या. मोटार, कंट्रोलरच्या सहाय्याने ती सायकल बॅटरीवर चालवण्याचा प्रयोग यशस्वी केला. योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाले तर खेड्यातसुद्धा असामान्य रँचो घडू शकतात हे सिद्ध करून दाखवले.

हेमूजी चंदेले महाविद्यालयाचे प्राचार्य नीलेश गायकवाड आणि आजी विमल यांच्या प्रोत्साहनामुळे या प्रयोगाला अंतिम स्वरूप दिल्याचे संकेतने सांगितले. कोरोनामुळे शाळा बंद पडली होती. आई दररोज शेतात काम करते तर वडील दिवस-रात्र शेतात राबत असत. त्यामुळे शाळा बंद असल्याने आणि शेती घरापासून सुमारे पंधरा किलोमीटर असल्याने तेवढे अंतर सायकलवर प्रवास करावा लागत असे. एकेदिवशी शेतातून येताना समोरून इलेक्ट्रिक दुचाकी गेल्याने आपण अशी सायकल बनवू शकतो का असा विचार संकेतच्या मनात आला आणि त्यानं बॅटरीवर चालणारी सायकल तयार केली.

शेळगाव ग्रामपंचायतीने त्याच्या या अचाट प्रयोगाबद्दल पाच हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केले आहे. ग्रामसेवक भाऊसाहेब सुरवसे व सदस्य विजय अडसूळ यांनी कौतुक केले. यावेळी माजी सरपंच सुरेश अडसूळ, प्रकाश गायकवाड, काकासाहेब बादगुडे, विजय अडसूळ आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

-----

असा साकारला प्रयोग

यासाठी अर्धा एचपीची मोटार, जुन्या पाठीवरील पंपाच्या चोवीस वॅटच्या दोन बॅटऱ्या, लाईट, हॉर्न आणि कंट्रोलर व जुनी सायकल याकरिता त्याला २० हजार रुपये खर्च आला. या बॅटरीला दोन तास चार्ज करावे लागते. यासाठी एक युनिट वीज लागते. यावर १२० किलो ओझे टाकून वाहिले तर सायकल २५ किमी जाते. यासाठी प्रतिकिलोमीटर २० पैसे खर्च येतो. बॅटरीची चार्जिंग संपल्यानंतर पायडलचा वापर करून सायकल चालवता येते.

-----

लेकरानं पांग फेडलं

मी व माझे पती दररोज शेतात कामाला जातो. मदत म्हणून संकेतला बोलावलं. आठ दिवस त्याने काम केल्यानंतर त्याचं लक्ष विचलित असल्याचे लक्षात आलं. त्याला विचारल्यावर सायकलबद्दल सांगितले. सुरुवातीला काहीतरीच वाटले. तो सायकल घेऊन काहीतरी करत होता. आमचं त्याच्याकडं लक्ष नव्हतं. आम्ही त्याला फक्त तीन हजार रुपये दिले. बाकी त्यानेच जमवल्याचे आई रेखा गायकवाड यांनी सांगितलं. प्रत्यक्ष सायकल तयार झाल्यावर ‘पोरानं आमचं पांग फेडल्याबद्दल अप्रुप वाटले’ असे वडील परमेश्वर गायकवाड यांनी सांगितले.

------

Web Title: The unstoppable idea finally materialized; A 25 km cycle runs for five rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.