...तोपर्यंत अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत : साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:33 AM2021-02-23T04:33:42+5:302021-02-23T04:33:42+5:30

बहुजन रयत परिषद महिला आघाडी, शाहू शिक्षण संस्था व सावली फाऊंडेशनतर्फे मंगळवेढा येथे मॉसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत मशाल व तलवार ...

... Until then, the atrocities will not stop: Salunkhe | ...तोपर्यंत अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत : साळुंखे

...तोपर्यंत अत्याचाराच्या घटना थांबणार नाहीत : साळुंखे

Next

बहुजन रयत परिषद महिला आघाडी, शाहू शिक्षण संस्था व सावली फाऊंडेशनतर्फे मंगळवेढा येथे मॉसाहेब जिजाऊंच्या वेशभूषेत मशाल व तलवार घेऊन शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला. प्रारंभी पुणे येथील उच्चशिक्षित तरुणांच्या ग्रुपचे शिवरायांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या पोवाड्याचे सादरीकरण झाले. जिजाऊच्या वेशभूषेत अवंतिका कलुबर्मे, रूपाली कलुबर्मे, भारती धनवे, हरिप्रिया उगाडे कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

यावेळी नगराध्यक्ष अरुणा माळी, बहुजन रयत परिषद महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमल साळुंखे, सावली फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा ढोबळे, भगीरथी नागणे, माधुरी हजारे, संगीता कट्टे, प्रफुल्लता स्वामी, सविता कट्टे, सुवर्णा गोवे, रूपाली जाधव, प्रा. लता माळी, प्रा. लक्ष्मण ढोबळे, ज्ञानेश्वर भगरे, विष्णुपंत आवताडे, प्रा. येताळ भगत, विजयराज कलुबर्मे, ॲड. हजारे, दिलीप निकम, सावंजी, ज्ञानेश्वर कौंडुभैरे, लहू ढगे, प्रशांत गायकवाड, प्रकाश खंदारे, कट्टे आदी उपस्थित होते.

फोटो लाईन ::::::::::::::::

मंगळवेढा येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित मशाल मोर्चात सहभागी झालेल्या महिला पदाधिकारी.

Web Title: ... Until then, the atrocities will not stop: Salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.