सांगोला एस-टी आगारात महिला कर्मचाºयांशी उद्धट वर्तन, दोन वाहतूक नियंत्रक, लिपिक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:54 PM2017-11-16T12:54:13+5:302017-11-16T12:55:50+5:30
सांगोला येथील एसटी आगारातील महिला कर्मचाºयाशी उद्धट वर्तन केल्याबद्दल पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत आगारातील दोन वाहतूक नियंत्रकासह वरिष्ठ लिपिक अशा तिघांना सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) यांनी निलंबित केले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सांगोला दि १६ : येथील एसटी आगारातील महिला कर्मचाºयाशी उद्धट वर्तन केल्याबद्दल पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत आगारातील दोन वाहतूक नियंत्रकासह वरिष्ठ लिपिक अशा तिघांना सोलापूर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) यांनी निलंबित केले आहे. या घटनेमुळे अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. ए. ए. सूर्यवंशी (वरिष्ठ लिपिक), ए. आर. चव्हाण व एस. एऩ काशीद (वाहतूक नियंत्रक) असे निलंबित केलेल्या कर्मचाºयांची नावे आहेत़
६ फेब्रुवारी २०१७ रोजी आगारातील कामकाजावरून एकमेकांना टोचून बोलण्यावरून वाद झाला़ यानंतर कोळेकर यांनी कोणाला काही न बोलता गप्प बसल्या, परंतु यांच्यात टोचून बोलणे, उद्धट भाषा वापरण्यावरून वाद वाढत गेला़ याबाबत कोळेकर या ११ आॅक्टोबर रोजी ताळेबंदची माहिती काढत असताना पी. डी. कुलकर्णी हे अॅथॉरिटी अर्ज लिहिण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना जरा थांबा मी माहिती काढत आहे. नंतर अर्ज लिहिते असे सांगितले, मात्र ते भंडारे यांच्याकडे गेले़ यावेळी ए. ए. सूर्यवंशी यांनी विनाकारण मध्येच टोचून बोलले़ हा विषय एवढ्यावरच न थांबता सूर्यवंशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोमणे मारून बोलून जाणून बुजून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करीत अशा आशयाची तक्रार कोळेकर यांनी विभागीय नियंत्रक सोलापूर व महिला लैंगिक अत्याचार तक्रार निवारण समितीकडे केली़ या तक्रारीची दखल घेऊन विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी ४ रोजी सांगोला आगारास भेट दिली. यावेळी त्यांनी कोळेकर यांच्या तक्रारीची विचारणा करून अद्यापपर्यंत या प्रकरणाची कागदपत्रे का आली नाहीत, म्हणून चौकशी केली़ यानंतर विभागीय वाहतूक अधिकारी (अपराध) तोंडले यांनी या तिघांवर निलंबनाची कारवाई केली़