'यूपीएससी' परीक्षाः तिसंगी येथील अजय सरवदे प्रथमच; सोलापूरचा तेजस तिसऱ्यांदा उत्तीर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:54 IST2025-04-23T16:54:05+5:302025-04-23T16:54:18+5:30
'यूपीएससी' परीक्षाः सारडा सध्या घेतोय प्रशिक्षण

'यूपीएससी' परीक्षाः तिसंगी येथील अजय सरवदे प्रथमच; सोलापूरचा तेजस तिसऱ्यांदा उत्तीर्ण
सोलापूर : यूपीएससी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत सोलापुरातून तेजस सारडा हा सलग तिसऱ्यांदा उत्तीर्ण झाला. त्याला १७७ वी रॅक मिळाली. २०२२, २३ नंतर २०२४ च्या परीक्षेत त्याने यश संपादन केले होते. पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावचा रहिवासी अजय नामदेव सरवदे पहिल्यांदा ही परीक्षा उत्तीर्ण झाला. त्या ८५८ ही रैंक मिळाली.
अजयचे आई-वडील मजूर असताना त्याने कष्टाने अभ्यास करून सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षेत यश संपादन केले. गावातच त्याने माध्यमिक आणि केबीपी महाविद्यालयातून त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कला शाखेमध्ये राज्यशास्त्र या विषयातील पदवी प्राप्त केली. बारावीपासून यूपीएससीची तयारी केली. यूपीएससी परीक्षा देण्याचा त्यांचा हा पाचवा प्रयत्न होता. यापूर्वी तीन वेळा ते यूपीएससीमध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचले होते. २०२३ पासून ते भारतीय क्रीडा प्राधिकरण या विभागात असिस्टंट डायरेक्टर म्हणून भोपाळ येथे कार्यरत आहेत. इथे काम करत असताना देखील त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.
सोलापूरच्या तेजस सारडा याचे शालेय शिक्षण दमाणी विद्यालयातून झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील जीएस मोदीचे महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी मिळवली. त्यावेळी ते राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला.
२०२२ साली ते पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यावेळी त्यांना भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर २०२३ साली ते पुन्हा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले. यावेळी त्यांना आयपीएसची रॅक मिळाली. त्यानुसार ते सध्या हैदराबाद येथे आयपीएसचे प्रशिक्षण घेत आहेत.
पुणे अन् दिल्ली गाठली
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यास अधिक अभ्यास लागतो. अजय सरवदे याने विचार करून त्यांनी बारावीपासूनच अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यास करण्यासाठी त्यांनी पुणे गाठले. तिथे पाच वर्षे, त्यानंतर दिल्लीमध्ये एक वर्ष अभ्यास केला.