मास्क वापरा... नाही तर भरा ५०० रुपये दंड; जिल्हा प्रशासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 12:26 PM2020-10-27T12:26:46+5:302020-10-27T12:26:59+5:30

कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना; पाच पट दंडाची रक्कम वाढविली

Use a mask ... otherwise pay a fine of Rs. Order of District Administration | मास्क वापरा... नाही तर भरा ५०० रुपये दंड; जिल्हा प्रशासनाचा आदेश

मास्क वापरा... नाही तर भरा ५०० रुपये दंड; जिल्हा प्रशासनाचा आदेश

googlenewsNext

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणाºयावर यापुढे ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करा, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आहेत.

यापूर्वी मास्क न वापरणाºयावर शंभर रुपयाची दंडात्मक कारवाई सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी काटेकोर करा असे सांगत २४ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद तसेच इतर विभागातील अधिकाºयांना मास्क वापरण्यासंदर्भात नवीन आदेश दिले आहेत.

सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा?्यावर यापूर्वी सोलापूर महानगरपालिका तसेच पोलीस आयुक्त कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई झाल्या. मोठी दंडात्मक रक्कम देखील वसूल झाली. पण आता दंडाच्या रकमेत पाचपट वाढ झाल्याने दंड वसूल रकमेत आणखीन मोठी वाढ होईल. दंडात मोठी वाढ झाल्याने मास्क न वापरणाºयांची संख्या देखील घटेल.

 

Web Title: Use a mask ... otherwise pay a fine of Rs. Order of District Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.