ऑनलाइन क्लासरुमचा वापर अन् ओपन बुक सिस्टीमचाही पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 03:10 PM2020-05-01T15:10:19+5:302020-05-01T15:12:34+5:30

महाराष्ट्र दिन विशेष; डिजीटल क्रांतीमुळे शिक्षण क्षेत्रात बदल

The use of online classrooms is also an alternative to the open book system | ऑनलाइन क्लासरुमचा वापर अन् ओपन बुक सिस्टीमचाही पर्याय

ऑनलाइन क्लासरुमचा वापर अन् ओपन बुक सिस्टीमचाही पर्याय

Next
ठळक मुद्देओपन बुक सिस्टीम परिक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी पुस्तक तसेच संदर्भ ग्रंथ हाताळण्यास मुभा दिली जाते रेडिमेट नोट्सची संकल्पना मागे पडेल. विद्यार्थ्याला परिक्षा देताना पुस्तकांचा वापर करण्यासाठी अभ्यास करावाच लागतो

सोलापूर : डीजीटल क्रांतीमुळे शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. या परिस्थितीत कोरोना विषाणमुळे या बदलांच्या वेगात वाढ झाली आहे. सध्या ऑनलाइन क्लासरुमचा वापर होत असला तरी भविष्यात याचा अधिक वापर होईल. ओपन बुक सिस्टीमचा पर्याय देखिल खुला असणार आहे. फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांचा वापर केला जाईल,असा निर्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरविद्यापीठाच्या वतीने महाराष्टÑ दिनाच्या पूर्वसंध्येला व्यक्त करण्यात आला.

विद्यापीठाकडून ऑनलाइन क्लास घेतले जात आहेत. परिक्षा, प्रवेश यासंबंधी युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) आणि राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार कारवाई करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या परिक्षा या होणार असून त्या ऑनलाइन की ऑनलाईन पद्धतीने घ्यायच्या या ठरल्या नाहीत. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाच्या परिक्षा आॅनलाईन करण्याचे सुचविले आहे. फिजीकल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्यासाठी हे गरजेचे आहे. परिक्षा देताना ओपन बुक सिस्टीमचा पर्याय वापरला जाऊ शकतो.युजीसी देशातील सर्व विद्यापीठांना प्रवेशाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सोलापूर विद्यापीठाचे प्रवेशास एक आॅगस्टपासून सुरुवात होणार आहे. तसेच एक सप्टेंबरपासून नियमितपणे वर्गही सुरु होतील. एक सप्टेबर पर्यंत परिस्थीतीत सुधारणा झाली नाही तर वर्ग देखिल आॅनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे

आपल्या विद्यापीठामार्फत आॅनलाईन पद्धतीने वगर्ही घेण्यात आले आहेत. तसेच शिक्षक हे ब्लॉग, व्हीडीओ, पावर पॉर्इंट प्रेझेंटेशन या डिजीटल माध्यमातून स्टडी मटेरिअल तयार करत आहेत. विद्यापीठात सुरु असणारे विविध कोर्स करण्याची अनेकांना आवड असते, पण वेळ मिळत नाही. या विद्यार्थ्यांसाठी नवी शिक्षण पद्धती फायद्याची ठरेल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.

ओपन बुक सिस्टीम म्हणजे काय ?
- ओपन बुक सिस्टीम परिक्षा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना परिक्षेवेळी पुस्तक तसेच संदर्भ ग्रंथ हाताळण्यास मुभा दिली जाते. परिक्षेत त्या संबंधितच प्रश्न विचारले जातात. ही पद्धती कॉपी-पेस्ट वर आधारित नसते. विचारलेल्या प्रश्नांची योग्य पद्धतीने उत्तरे देण्यासाठी अधिक कौशल्य लागते. ज्या विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केलेला असतो तोच या परिक्षेत यशस्वी होऊ शकतो. यामुळे रेडिमेट नोट्सची संकल्पना मागे पडेल. विद्यार्थ्याला परिक्षा देताना पुस्तकांचा वापर करण्यासाठी अभ्यास करावाच लागतो.

Web Title: The use of online classrooms is also an alternative to the open book system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.